पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

णें फार प्रसिद्धीस आलेले होतें. त्यावेळी मांडवगडाची राज्यसत्ता फार प्रबळ असून उज्जनीचे राजेहि तिचे मांडलीक होते. पुढे मांडवगडावर मुसलमानांनी ज्या अनेक स्वान्या केल्या. त्यांतील शेवटली स्वारी अल्लाउद्दिन खिलजी यानें सन १३०५ त केली. त्यावेळी तेथें जो घनघोर रणसंग्राम झाला. त्यांत एकोणीस हजार प्रभु क्षत्रियांनी जोहार केल्याचें ब्रिग | साहेबानें आपल्या इतिहासांत नमूद केलेच आहे. ह्या रणसंग्रामांत मांडवगडची राज्यसत्ता मुसलमानांच्या हस्तगत झाली, ते प्रजेवर जुलूम करूं लागले तेव्हां तेथील लोक स्वसंरक्षणार्थ जिकडे वाव मिळेल तिकडे निघून गेले, त्यापैकी कांहीं दक्षिणेत आले. त्यांत दिघे घराण्यांतील कांहीं कुटुंबें दक्षिणेंत आली. त्यांनी आपलें वास्तव्य प्रथम सह्याद्री पर्वतांत बऱ्याच अवघड ठिकाणीं केलें. व तेथून ते पुढे आपल्या उदरनिर्वाहार्थ निरनिराळ्या ठिकाणी दक्षिणेंत गेले.

 या दिघे घराण्यासंबंधी कांही प्राचीन ऐतिहासिक माहिती उपलब्ध झाली ती:- राजपुतान्याच्या पूर्व भागास दिघा या नांवाचें हल्ली खेडें आहे हें पूर्वी मोठ्या प्रसिद्ध शहरांत गणले जात असावें असें तेथील प्राचीन इमारतीचे पडके पाये, खिंडारें वगैरे दिसतात, त्यावरून प्राचीन इतिहाससंशोधकाचें मत आहे. दिघा हें गांव अगर शहर त्यावेळीं तालभोपाल येथील राजाच्या ताब्यांत

होतें, व ह्या राज्यामध्यें प्रभुक्षत्रिय बऱ्याच प्रमुखत्वानें होते त्यांचेपैकीं,


 *आणीबाणीच्या वेळी क्षत्रियलोक आपल्या बायकापोरांस ठार मारून नंतर शत्रू बरोबर सामना करण्यास सिद्ध होतात. त्यास " जोहार" असे म्हणण्याचा सांप्रदाय असे. जोहार हा शब्द जयहार याचेंच रूपांतर आहे.

 + ब्रिग कृत माळव्याचा इतिहास भाग ४ था.