पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वीरांचें साह्य लागतें, तद्वतच त्यांच्या अंतःकरणांची जरूरी लागते. तें करण्या- करितां हजारों, लाखोशे लोकांचें संगनमत व्हावयास पाहिजे. मतभेद अगर जातिद्वेष समूळ नष्ट झाला पाहिजे. अशी एकजूट व एकजीव झाल्यावरच तें

कार्य यशस्वी होतें.

श्रीशिवाजीमहाराजांस

स्वाभिमानयुक्त व देशप्रीतीनें

प्रेरित झालेले वीर मिळाले, ह्मणूनच, त्यांना यवनी राज्यावर तीव्र आघात करून, त्यांस कमकुवत करितां आलें, व मराठी राज्याची इमारत अल्प अवका- शांतच उभारतां आली. ही इमारत बांधण्याच्या कामी ज्यांनी प्रथमपासूनच स्वयंस्फूर्तीनें साह्य केले. त्या नररत्नांपैकी मावळा सरदार विश्वासराव नानाजी हे एक होत; ह्मणूनच त्याचें अल्प चरित्र आह्मी वाचकांस सादर करीत आहोत.

 आमच्या देशाचा प्राचीन इतिहास उपलब्ध नाहीं. ही एक मोठी उणीव आहे; परंतु ही उणीव आतां सर्वस्वी भरून निघणें शक्य नाहीं. आमच्या प्राचीनांनी आपला वृत्तांत लिहून ठेविला नाहीं, त्याबद्दल त्यांनाहि दोष देतां येत नाहीं. कारण त्या वेळी एक तर इतिहास लिहिण्याचा परिपाठ कमी असावा, शिवाय त्यांस राज्यअस्थिरतेमुळे वारंवार इकडूनतिकडे आणि तिकडून दुसरीकडे, प्रयाण करणे भाग पडे. यास्तव देहसंरक्षणार्थ त्यांस काल कंठावा लागे. अर्थात् लेख लिहिण्यास अगर ते सुरक्षित ठेवण्यास दुरापास्तच असे. परंतु जी कांहीं माहिती उपलब्ध आहे, तिचा शक्य तो फायदा घेऊन तिचे संगोपनार्थ प्रयत्न करावा हेच आतां योग्य आहे. असो !

 चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञातींत जी कित्येक घराणीं प्राचीन कालापासून प्रसिद्ध होतीं व अद्यापहि आहेत. त्यांत दिघे वंशाचा समावेश होतो. ह्या घराण्याचा विस्तार, सांप्रत मुंबई इलाखा, मध्यप्रांत, सेंट्रल इंडिया वगैरे भा- गांत पसरलेला आहे. प्राचीन काळीं उत्तर हिंदुस्थानांत मांडवगड येथें हें घरा-