पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्री
मावळा सरदार
विश्वासराव नानाजी दिघे, देशपांडे
यांचें चरित्र.
भाग पहिला
पूर्व वृत्तांत.

श्री छत्रपति शिवाजीमहाराजांच्या काळांत स्वाभिमानी व देशभक्त असे अनेक लोक निर्माण झाले ह्मणूनच त्यांना मराठी पादशाहीचा पाया घालितां आला, तद्वत् त्यांचे सर्व प्रयत्न यशस्वी झाले. त्यावेळी त्यांना जर हजारों स्वाभिमानी व देशभक्त, आपल्या प्रियप्राणावर उदार होऊन येऊन मिळाले नसते, तर त्यांच्या एकट्याच्या हातून हिंदूपदपादशाही, स्थापण्याचें मोठ्या जोखमाचें काम पार पडले असते किंवा नाही, याबद्दल बरीच शंका येणें साह- जिकच आहे. स्वातंत्र्य मिळविण्याच्या कार्यात अनेक नर-रत्नें पैदा व्हावी लागतात. स्वातंत्र्य मिळवून स्वराज्य स्थापन करणें, हैं एकट्या दुकट्याला अगदी अशक्य आहे. हे एकाचें काम नाहीं, ते अनेकांचे काम आहे. त्याला पुष्कळ
-