पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तेजित लिंगावर कंडोम व्यवस्थितपणे कसा चढवायचा याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी कृत्रिम लिंगाचा वापर करता येतो. काही उपकरणं लैंगिक उत्तेजनेसाठी/सुखासाठी वापरली जातात. उदा. कृत्रिम लिंग इत्यादी. ही विभागणी अगदी ढोबळपणे केली आहे कारण काही उपकरणं अनेक वर्गात बसू शकतात. वैदयकीय उपकरणं योनी डायलेटर 'व्हेंजिनिस्मस' समस्या सोडवण्यासाठी योनी डायलेटरचा वापर केला जातो. कमरेच्या भागाला रेडिएशन दिलं असलं तर योनी आकुंचन पावू शकते किंवा योनीची शस्त्रक्रिया झाली तर योनी आकुंचन पावण्याची शक्यता असते. अशी अनेक कारणं आहेत, ज्याच्यासाठी योनी डायलेटर या उपकरणाचा उपयोग होतो. हे उपकरण रबर, प्लॅस्टिक किंवा सिलिकोनचं बनवलेलं असतं. या डायलेटरचे वेगवेगळे आकार असतात. हे उपकरण डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे योनीत घालायचं असतं. (बघा सत्र-लैंगिक समस्या). 'सक्शन पंप','कॉक रिंग' ज्यांच्या लिंगाला उत्तेजना येण्यास अडचण येते अशांना 'सक्शन पंप' चा वापर करता येतो. लिंगावर पंपची ट्यूब लावून हा पंप सुरू केला की पंप ट्यूबमधील हवा ओढून घेतो. हवा ओढली गेल्यामुळे ट्यूबमध्ये पोकळी (व्हॅक्यूम) तयार होते व त्यामुळे लिंग उत्तेजित होते. लिंग उत्तेजित झाल्यावर, लिंगातील रक्तपुरवठा कमी होऊ नये म्हणून लिंगाच्या देठावर एक रबराची 'कॉक रिंग' चढवली जाते. मग पंप काढून संभोग करता येतो. वीर्यपतन झालं की ही रिंग काढली जाते. या सक्शन पंपाची एक मोठी अडचण लैंगिक इच्छा झाली की हे उपकरण वापरून लिंग उत्तेजित करायच्या कालावधीत 'मूड' जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वेळा सक्शन पंप न वापरता लिंग उत्तेजित झाल्यावर लिंग 'कडक' राहावं म्हणून नुसती 'कॉक रिंग' लिंगाच्या देठावर बसवली जाते. वीर्यपतन झालं की ही रिंग काढली जाते. सावधान - 'कॉक रिंग' ही दहा-पंधरा मिनिटांच्या वर लिंगावर चढवू नये. रक्तप्रवाह फार काळ बंद राहिला तर लिंगातील पेशी मरायला लागतात. रबर लवचीक असतं म्हणून कॉक रिंग' ही रबराची असावी. (धातूची 'कॉक रिंग' अजिबात वापरू नये.) रबरी 'कॉक रिंग'ला कडा असाव्यात. या कडा पकडून उत्तेजित लिंगावरून ही रिंग काढण्यास सोपं जातं. अशा कडा नसल्यास लिंगाची उत्तेजना जात नाही तोवर ही रबराची रिंग काढणं अवघड होतं. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख ८५