पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'अँड्रो पेनिस' 'अँड्रो पेनिस' म्हणून एक उपकरण अमेरिकेत उपलब्ध आहे जे लिंगाची लांबी काही प्रमाणात (अंदाजे दीड इंच) वाढवण्यास मदत करते असा निर्मात्यांचा दावा आहे. ते दररोज काही तास शिथिल लिंगावर बसवायचं असतं. ते शिथिल लिंग ताणून ठेवून लिंगाची लांबी वाढवते. तसंच लिंगाला खूप बाक असेल ('कॉर्डी) तर हे उपकरण वापरून तो बाक कमी करण्यास मदत करते असा निर्मात्यांचा दावा आहे. इरॉस थेरपी ज्या स्त्रियांना काही विशिष्ट शारीरिक आजारांमुळे लैंगिक उत्तेजना येण्यास अडचण येत असेल अशांना या उपकरणाचा फायदा होऊ शकतो असा निर्मात्यांचा दावा आहे. हे उपकरण त्यांच्या बाह्य जननेंद्रियांवर लावून वापरायचं असतं. हे उपकरण एका हलक्या सक्शन पंपासारखं काम करतं. या उपकरणाचा आठवड्यातून तीन ते चार वेळा वापर करण्याने जननेंद्रियांतील रक्तप्रवाह वाढ व त्यांना संभोगात लैंगिक सुख मिळण्याचे प्रमाण वाढते असा निर्मात्यांचा दावा आहे. SCAMAREROID पेनाईल इम्प्लांट ज्या पुरुषाचं लिंग उत्तेजित होण्यास अडचण येते अशांना शस्त्रक्रिया करून 'पेनाईल इम्प्लांट' बसवता येतं. या उपकरणाच्या आधारे लिंगाला ताठरता आणता येते. या उपकरणाचे विविध प्रकार आहेत. ही शस्त्रक्रिया करून घेतलेल्या फार थोड्याजणांना समाधानकारक परिणाम मिळतो. ८६ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख