पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लैंगिक उपकरणं “सेक्ससाठी रबराची बाहुली मिळते असं मी ऐकलं आहे. आपल्या इथे ती मिळते का?" किंवा "कृत्रिम लिंग कुठे मिळेल?" अशा त-हेचे प्रश्न मला हेल्पलाईनवर अनेक वेळा विचारले जातात. लैंगिक सुख देणाऱ्या खेळण्यांची आपल्या देशात (इतर देशांसारखीच) खूप मागणी आहे. अशा उपकरणांची गरजही आहे. अनेकांनी वयाची पंचविशी ओलांडली तरी लैंगिक अनुभव घेतलेला नसतो. संभोग करायची तीव्र इच्छा असते. पण लग्न झाल्याशिवाय लैंगिक अनुभव घ्यायचा नाही अशी आपली संस्कृती असल्यामुळे अनेकांच्या लैंगिक इच्छांचा कोंडमारा होतो. त्यांची लैंगिक सुखाची गरज काही अंशीतरी ही उपकरणं वापरून किंवा अश्लील वाङ्मय बघून पुरी होते. लग्न होऊन काही वर्ष गेल्यानंतर आपल्या एकाच जोडीदाराबरोबर तीच तीच प्रणयक्रीडा करायचा कंटाळा येतो. शरीरही पूर्वीसारखे ताबडतोब साथ देत नाही. तारुण्यात लैंगिक उत्तेजना देण्यास कल्पनाशक्ती पुरी असायची ती आता पुरी पडत नाही. पूर्वीसारखी 'पॅशन' नसते. ती यावी म्हणून संभोगात नावीन्य आणण्याची गरज वाढते. यासाठी काहीजण अश्लील वाङ्मयाचा आधार घेतात. काहीजण लैंगिक उपकरणांचा वापर करतात. काहीजण 'फोन सेक्स' किंवा 'चॅट रूम' सेक्सचा वापर करतात. लग्न न झालेल्या प्रौढ व्यक्तीला किंवा विधवा व्यक्तीला लैंगिक जोडीदार मिळणं कठीण असतं. अशा वेळी काही अंशीतरी आपली लैंगिक गरज पुरी करण्यासाठी लैंगिक उपकरणांचा वापर करता येतो. लैंगिक उपकरणं लैंगिक उपकरणांच्या कार्यानुसार त्यांची विविध गटांत विभागणी करता येते. काही उपकरणं ही लैंगिक समस्येवर उपाय म्हणून वापरली जातात. उदा. 'व्हॅजिनिस्मस' साठी योनी 'डायलेटर' उपकरणाचा वापर केला जातो. काही उपकरणं लैंगिक शिक्षणासाठी वापरली जातात. उदा. लैंगिक शिक्षण देताना ८४ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख