पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रोखून धरणं अशक्य होतं. पुरुषबीज वाहिन्यांतून पुरुषबीजं व वीर्यकोषातील वीर्य पूरस्थ ग्रंथीत येतं. पूरस्थ ग्रंथीचा स्राव, पुरुषबीजं व वीर्यकोषातील वीर्य एकत्रितपणे लिंगातून पिचकारीसारखं बाहेर पडतं. वीर्य बाहेर पडण्याचा जो क्षण असतो तो संभोगातील लैंगिक सुखाचा परमोच्च बिंदू असू शकतो (ऑरगॅझम). दरवेळी वीर्यपतनाच्या वेळी परमोच्च आनंदाची भावना मिळेलच असं नाही. आजार, औषधं, ताणतणाव इत्यादी कारणांमुळे काही वेळा वीर्यपतन होताना अजिबात सुख जाणवत नाही किंवा अगदी थोडं जाणवतं (अनेस्थेटिक ऑरगॅझम).

जननेंद्रियांची शिथिलता

 वीर्यपतन झालं, की शरीर एकदम सैल पडतं. काहींना पूर्णपणे गळून गेल्यासारखं वाटतं. लिंगातील उत्तेजना जाते. रक्तदाब कमी होतो. याच्यानंतर लिंग काही काळासाठी उत्तेजित होऊ शकत नाही. या शिथिलतेचा कालावधी किती असतो? तरुणपणी हा कालावधी काही मिनिटांचा असू शकतो. हळूहळू जसजसं वय वाढतं तसतसा हा कालावधी वाढायला लागतो. तरुण मुलं कमी कालावधीत जास्त वेळा संभोग करू शकतात.

स्त्री

लैंगिक उत्तेजना

 स्त्रीला एखादया व्यक्तीकडे बघून/एखाद्या व्यक्तीचा मनात विचार येऊन / एखादं चित्र बघून लैंगिक इच्छा निर्माण होते. लैंगिक इच्छा झाली की हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो. शिस्निकेत, मोठ्या व छोट्या भगोष्ठात, योनीत रक्तप्रवाह वाढतो. शिस्निका व भगोष्ठ उत्तेजित होऊन फुगतात, योनीच्या आतील स्त्राव वाढून योनीतील ओलावा वाढतो. 'ऑरगॅझमिक प्लॅटफार्म' तयार होतो. स्तनांची बोंडे (स्तनाग्रे) फुगतात.

लैंगिक अनुभवाचे टप्पे

स्त्री उत्तेजना→ संभोग 'ऑरगॅझम' जननेंद्रीय शिथिलता जननेंद्रीय शिथिलता संभोग स्त्रीला लिंगाच्या घर्षणानं सुख मिळतं ते प्रामुख्यानं योनिमुखाच्या लगतच्या योनीच्या पहिल्या दोन इंचातून (ऑरगॅझमिक प्लॅटफॉर्म). ७८ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख