पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गैरसमज झाला. , समलैंगिकता भारतात हजारो वर्षांपासून आहे याचे अनेक पुरावे आहेत. 'मनुस्मृती', 'नारदस्मृती इत्यादी ग्रंथांत समलैंगिकतेचे उल्लेख आहेत. 'कामसूत्र' च्या ग्रंथात दोन पुरुषांमधली संभोगाची व दोन स्त्रियांमधील संभोगाची वर्णनं आहेत. काही पुरातन देवळांवर समलिंगी संभोग दर्शवणारी शिल्प आहेत. या सगळ्यांतून स्पष्ट आहे की समलैंगिकता ही काही पाश्चात्त्य देशातून आलेली नाही. पाश्चात्त्य देशांतून आली आहे, ती मानवी अधिकारांची संकल्पना, समलिंगी समाजाच्या अधिकारांची मागणी. डॉ. किनसे प्रमाणपट्टी १९४८ मध्ये अमेरिकेत डॉ. अल्फ्रेड किनसे यांनी अमेरिकन पुरुषांच्या लैंगिक वर्तनाचं सर्वेक्षण केलं. किती पुरुष भिन्नलिंगी लैंगिक संबंध ठेवतात, किती पुरुष समलिंगी लैंगिक संबंध ठेवतात, कितीजणं पुरुष आणि स्त्रियांशी संबंध ठेवतात इत्यादी आकडेवारी त्यांनी प्रसिद्ध केली. या अभ्यासासाठी त्यांनी एक प्रमाणपट्टी तयार केली. त्याला 'डॉ. किनसे प्रमाणपट्टी' म्हणतात. या प्रमाणपट्टीत ० ते ६ असे ७ भाग आहेत. • म्हणजे पूर्णपणे भिन्नलिंगी. ६ म्हणजे पूर्णपणे समलिंगी आणि मधले आकडे म्हणजे उभयलिंगी. यात त्यांनी ज्या ज्या व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या त्या व्यक्ती या प्रमाणपट्टीवर कुठे बसतात, याचा अंदाज घेतला. लैंगिक कल भिन्नलिंगी उभयलिंगी समलिंगी . १ ३ ४ ५ ६ व्यक्तींची नावे - b, k, J e,f r c.m उदा. आकृतीमधील प्रमाणपट्टीमधील b,k, 1 या व्यक्ती पूर्णपणे भिन्नलिंगी आहेत. e,f व्यक्ती जवळपास भिन्नलिंगी आहेत. समलैंगिकतेकडे झुकणारी उभयलिंगी व्यक्ती आहे. cm या पूर्णपणे समलिंगी व्यक्ती आहेत. T S अनेक उभयलिंगी व्यक्ती माझ्याकडे येतात व त्या गोंधळलेल्या आहेत असं सांगतात. त्यांना काही पुरुषाबद्दल भाविनक, लैंगिक आकर्षण वाटतं व काही स्त्रियांबद्दलही आकर्षण वाटतं. आपल्याला पुरुष किंवा स्त्री-लिंगाच्या मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख ४७ २