पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लिंगभाव लिंगभावाची (जेंडर आयडेंटिटी) संकल्पना समजून घेण्यासाठी 'स्त्री' व 'पुरुष' यांचे गुणधर्म व त्यांची विभागणी समजून घेणं गरजेचं आहे. समाजानं माणसांच्या अनेक महत्त्वाच्या गुणधर्माची विभागणी 'पुरुषी' व 'बायकी' अशी केली आहे. ही विभागणी व त्याच्या मर्यादा समजून घेण्यासाठी काही मोजके गुणधर्म घेऊ- शृंगार, नाजूकपणा, भावनाप्रधान असणं, ताकद, आक्रमकता, लैंगिक आकर्षण, लैंगिक भूमिका. समाजानं या गुणधर्मांची विभागणी खालीलप्रमाणे केली आहे. पुरुषी बायकी शृंगार नाजूकपणा भावनाप्रधान असणं ताकद आक्रमकपणा स्त्रीबद्दल लैंगिक आकर्षण 'इनसर्टिव्ह' लैंगिक भूमिका पुरुषांबद्दल लैंगिक आकर्षण 'रिसेप्टिव्ह' (स्वीकृत) लैंगिक भूमिका समाजाने केलेल्या या विभागणीत खूप मर्यादा आहेत. पहिली अशी, की या प्रत्येक गुणधर्मात वास्तवात अनेक छटा असतात. उदा. आक्रमकपणा. एखादी व्यक्ती आक्रमक आहे का? या प्रश्नाचं बरोबर उत्तर फक्त 'हो' किंवा नाही' एवढ्या दोनच पर्यायात देणं अवघड होतं. जर 'खूप आक्रमक', 'थोडा आक्रमकपणा', 'साधारण', 'थोडी शामळू', 'खूप शामळू' असे पर्याय दिले, तर या प्रश्नाचं उत्तर जास्त अचूक मिळू शकतं. फार थोड्या व्यक्ती पहिल्या (खूप आक्रमक) व शेवटच्या पर्यायात (खूप शामळू) बसतात. बहुतेक व्यक्ती या दोघांमधल्या छटांमध्ये बसतात. त्यामुळे अशा दोनच भागांत गुणधमांची केलेली विभागणी वास्तवाचं खरं प्रतिबिंब दाखवत नाही. ३२ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख