पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्याच्या वापरानं काही स्त्रियांना 'टॉक्सिक शॉक सिंड्रोम' होऊ शकतो, ज्याच्यामुळे त्या स्त्रीचा जीव जाऊ शकतो. सॅनेटरी नॅपकिन मासिक पाळीचे प्रश्न मी काही महिलांची लैंगिकतेवरची कार्यशाळा घेत होतो. त्या महिला दूरदूरच्या जिल्ह्यातून आल्या होत्या. त्यांचे पाळीबद्दल अनेक प्रश्न होते. मी लैंगिक शिक्षणाच्या दृष्टीनं माहिती दिली पण त्यांच्या वैयक्तिक समस्या होत्या ज्याची उत्तरं (मी डॉक्टर नसल्यामुळे)माझ्यापाशी नव्हती. एक ताई एकदम चिडून म्हणाल्या, "मग काय उपयोग आहे तुमच्या इथे येण्याचा? त्यापेक्षा एखादा डॉक्टर पाठवायचा होता. आम्ही इथे घरापासून दूर आलो आहोत. निदान आम्ही आमची तपासणी करून घेतली असती.” (त्यांची भावना मी समजू शकत होतो. हतबल होतो व निरुत्तरही.) स्त्रियांच्या कार्यशाळेत सर्वांत जास्त प्रश्न येतात, ते त्यांच्या मासिक पाळीवरचे. आपली पाळी इतरजणींच्या तुलनेत कमी येते का जास्त येते? त्याच्यामुळे गर्भधारणा होण्यास अडचण येईल का? असे असंख्य प्रश्न असतात. मुलगी वयात आल्यापासून तिला सरासरी २८ दिवसांनी एकदा मासिक पाळी येऊ लागते. सरासरी या शब्दाला महत्त्व आहे. उदा. मागच्या वेळी २६ दिवसांनी आली तर यावेळीही ती पाळी २६ दिवसांनीच येईल असं नाही. कदाचित या वेळी ती २८ व्या दिवशी येईल. कधी पाळी लवकर तर कधी उशिरा, असं का होतं? याला अनेक कारणं असतात. मासिक पाळी ही शरीरातील काही संप्रेरकांच्या (इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरोन) प्रमाणावर अवलंबून असते. आपला आहार, शारीरिक परिश्रम, आजार, औषधं, दारू/नशेच सेवन यांसारख्या अनेक गोष्टींवर या नावांचा चढउतार अवलंबून असतो. त्यामुळे दर महिन्याला पाळी थोडी पुढे-मागे होते. मानसिक ताणामुळेही पाळीचक्रात फरक पडतो. डॉ. सनत पिंपळखरे म्हणाले, "परीक्षा जवळ आली की ताणामुळे मुलींच्या पाळीचक्रात फरक पडतो. पण हे तात्पुरतं असतं. परीक्षा झाली की पाळी परत नियमित होते.' " मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २९