पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मासिक पाळी चालू मासिक पाळीच्या अगोदर मासिक पाळी संपल्यावर जर गर्भधारणा झाली नाही तर या विशिष्ट पेशींच्या थराची जरूर राहत नाही व महिन्याअखेर तो थर गळायला लागतो. गर्भाशयातील या विशिष्ट पेशी, रक्त हळूहळू योनीतून बाहरे येतं. हे कार्य सरासरी ३ ते ५ दिवस चालतं. पुढच्या महिन्यात परत एक स्त्रीबीज परिपक्व होतं व परत गर्भाशयात विशिष्ट पेशींचा थर तयार व्हायला लागतो. हे चक्र सरासरी २८ दिवसांनी एकदा येतं म्हणून त्याला 'मासिक चक्र' किंवा 'मासिक पाळी' म्हणतात. गर्भधारणा, बाळंतपणाचा काळ व स्तनपानाचा काळ सोडला, तर ही मासिक पाळी रजोनिवृत्तीपर्यंत चालू राहते. - मासिक पाळीच्या वेळची स्वच्छता मासिक पाळीच्या वेळी स्वच्छता ठेवायचे मार्ग (१) मेडिकलच्या दुकानात 'सॅनेटरी नॅपकिन्स' मिळतात. चड्डीच्या आत 'सॅनेटरी नॅपकिन' ठेवून मासिक पाळीचं रक्त शोषून घेण्यासाठी याचा वापर करता येतो. (२) जुना झालेला सुती कपडा फाडून त्याच्या उभ्या पट्ट्या कराव्यात. मग त्या धुऊन, वाळवून त्या पट्ट्यांची घडी करून चड्डीच्या आत ठेवावी. ती रक्तानं भिजली की बदलावी. वापरलेली घडी परत वापरण्याआधी साबणाने स्वच्छ धुऊन उन्हात वाळवावी. अंधाऱ्या जागेत जर वाळवली तर त्यावर बुरशी येते व त्या कपड्याचा परत वापर झाला, तर जननेंद्रियांना बुरशीची लागण होते. (३) पूर्वी टॅम्पून वापरले जायचे. आजही मेडिकल शॉपमध्ये ते उपलब्ध आहेत पण हल्ली यांचा वापर खूप कमी प्रमाणात होतो. याला कारण असं की २८ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख