पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-स्त्रीबीजवाहिनी मूत्राशय बल्बोयुरेशल ग्रंथी मूत्रमार्ग स्त्रीबीजांड शिस्निका -छोटं भगोष्ठ योनिमार्ग •मोठं भगोष्ठ गर्भाशय गर्भाशय बारथोलिन ग्रंथी गर्भाशय ही एक छोट्या पेरूच्या आकाराची पिशवी आहे. ही पिशवी लवचिक असते व गर्भधारणा झाली की गर्भ जसा वाढतो तशी ती मोठी होऊ शकते. स्त्रीबीजवाहिन्या गर्भाशयाला जोडलेल्या दोन स्त्रीबीजवाहिन्या असतात. स्त्रीबीजवाहिनीच्या दुसऱ्या बाजूला तिच्या तोंडाशी अनेक 'फिंब्रे' असतात. ('फिब्रे' म्हणजे जशी हाताच्या पंजाला बोटं असतात तशी अनेक पातळ बोटं असतात.) स्त्रीबीजांड स्त्रीच्या शरीरात दोन स्त्रीबीजांड असतात. ही बीजांड 'फिब्रे' च्या जवळ असतात. जन्मत:च या बीजांडात असंख्य स्त्रीबीजं असतात. ही स्त्रीबीजं परिपक्व नसतात (म्हणजे ती कच्ची असतात.). या बीजांडात काही लैंगिक संप्रेरक तयार होतात. स्त्रीची लैंगिक इच्छा, मासिक पाळी, गर्भधारणेचा या संप्रेरकांशी संबंध असतो. मासिक पाळी मुलगी वयात आली की अंदाजे दर महिन्याला दोघांपैकी कोणत्या तरी एका बीजांड्यातील एक स्त्रीबीज परिपक्व होतं. बीज परिपक्व झालं की ते बीजांड्यातून बाहरे येतं. हे बीज स्त्रीबीजवाहिनीच्या 'फिक्रे' अडकवतात व हे बीज स्त्रीबीजवाहिनीत येतं. स्त्रीबीजवाहिनीतून हे बीज हळूहळू गर्भाशयाकडे सरकायला लागतं. हे होताना अजून एक महत्त्वाची गोष्ट घडत असते. गर्भाशयाच्या आतील भागात विशिष्ट पेशींचा थर तयार होतो. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २७