पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिस्निका मोठं भगोष्ठ छोटं भगोष्ठ शिस्निका (दाणा) (क्लिटोरिस) मूत्रमार्गमुखाच्या थोड्या वरच्या बाजूला दाण्यासारखा दिसणारा अवयव आहे. याला शिस्निका म्हणतात. हिच्यावर एक त्वचा असते. बाहेरून दिसायला जरी शिस्निका छोटी दिसली तरी ती प्रत्यक्षात मोठी असते. तिच्यात खूप मोठ्या प्रमाणात चेतातंतू (नर्वज्) असतात. म्हणून ती अत्यंत संवेदनशील आहे. तिला स्पर्श करून लैंगिक उत्तेजना व सुख मिळण्यास मदत होते. लैंगिक उत्तेजना झाली की या अवयवात जास्त रक्तपुरवठा केला जातो व हा अवयव फुगतो. लैंगिक उत्तेजना गेली की त्यातीत रक्तप्रवाह कमी होतो व शिस्निकेची उत्तेजना जाते. शिस्निकेतून वीर्य येत नाही. स्त्रियांमध्ये वीर्य तयार होत नाही. MAMATA स्त्रीबीजवाहिनी स्त्रीबीजांड शिस्निका गर्भाशय -मूत्रमार्गमुख योनिमार्ग 'योनिमुख बारथोलिन ग्रंथी गुदद्वार मूत्रमार्गमुख व मूत्रमार्ग मूत्रपिंडातून तयार झालेली लघवी मूत्राशयात साचते. तिथून लघवी मूत्रमार्गमुखातून बाहेर येते. शिस्निकेच्या थोडं खाली हे मूत्रमार्गमुख असतं. हे छिद्र खूप छोटं असतं. संभोगाच्या वेळी याच्यातून लिंग आत जाऊ शकत नाही. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २५