पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मूत्राशय मूत्रपिंडातून येणारी नळी वीर्यकोष पुरुषबीजवाहिनी मूत्रमार्ग पूरस्थ ग्रंथी (प्रोस्टेट ग्लँड) शिस्न/लिंग कौपग्रंथी गुदद्वार एपीडीडीमीस वृषण शिस्नमुंड फ्रेन्युलम शिस्नमुंडाच्या खाली, शिस्नमुंडाला व लिंगाला जोडणारी एक त्वचा असते, याला फ्रेन्युलम' म्हणतात. फायमॉसिस काही मुलांची शिस्नमुंडावरची त्वचा खूप आवळलेली ('टाइट') असते व शिस्नमुंडाच्या मागे सरकवता येत नाही. याला 'फायमॉसिस' म्हणतात. फायमॉसिस असलेले पुरुष जेव्हा लिंग-योनीमैथुन किंवा गुदमैथुन करायला जातात, तेव्हा लिंग योनीत/गुदात घालताना शिस्नमुंडावरची त्वचा मागे सरकायला त्रास होतो व खूप दुखतं. त्यामुळे संभोग करताना खूप त्रास होतो. आपल्याला फायमॉसिसची अडचण आहे का? हे बघण्यासाठी लिंग उत्तेजित झाल्यावर त्वचा सहजपणे शिस्नमुंडावरून मागे-पुढे होते का नाही हे पाहावं. हे कातडं जर खूप 'टाइट' असेल तर डॉक्टरांकडे जाऊन तपासून घ्यावं. डॉक्टरांनी फायमॉसिसचं निदान केलं, तर छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. याला सुंता करणं ('सरकमसिशन') म्हणतात. सुंता केल्यावर शिस्नमुंड उघडं राहतं. सुंता केल्यानं लैंगिक सुखास बाधा येत नाही. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २१