पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वृषणात अनेक पातळ नळ्या असतात (सेमिनीफेरस ट्यूब्यूल्स). वयात आल्यावर टेस्टोस्टेरोन संप्रेरकामुळे, यांच्यामध्ये पुरुष बीजं तयार होऊ लागतात व मग ती एपीडीडीमीसमध्ये पोहोचून तिथे त्यांची वाढ पूर्ण होते. वयात आल्यापासून पुरुषबीजांची निर्मिती आयुष्यभर चालू राहते. पुरुषबीजं तयार होण्यास विशिष्ट तापमान लागतं. हे तापमान शरीराच्या तापमानापेक्षा थोडं कमी असतं. हे तापमान सांभाळण्यासाठी खूप थंडी असते तेव्हा वृषण शरीराच्या जवळ ओढली जातात व जेव्हा खूप उष्णता असते, तेव्हा वृषण शरीरापासून दूर केली जातात (जास्ती खाली लोंबतात). जर वृषणांना सातत्यानं जास्त तापमान जाणवलं, तर पुरुषबीजांच्या निर्मितीवर विपरीत परिणाम होतो. म्हणून मुलांनी सैल चड्डी घालावी. कुस्ती / व्यायाम करणाऱ्यांनी लंगोट घातला तर व्यायाम झाल्यावर लंगोट काढून सैल चड्डी घालावी. १ वृषणाचा छेद लिंग शिस्नमुंड एपीडीडीमीस -फ्रेन्युलम सेमिनीफेरस ट्यूब्यूल्स Breerutam लिंग/शिस्न लिंग हा तीन मासुल नळ्यांनी बनलेला अवयव आहे. लिंगाच्या टोकाला एक फुगीर भाग असतो ज्याला शिस्नमुंड म्हणतात. लिंगातून लघवी बाहेर सोडली जाते. वयात आल्यावर लिंगाच्या कार्यात अजून भर पडते. लिंग संभोगाचा एक अवयव बनतं. शिस्नमुंड शिस्नमुंडावर एक त्वचा असते. मुलगा तारुण्यात आल्यावर त्याच्या शिस्नमुंडावरची त्वचा हळूहळू शिस्नमुंडाच्या मागे नेता येते. २० मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख