पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यौवनात प्रवेश तारुण्यात प्रवेश करताना शरीरामध्ये झपाट्यानं वाढ होते. मुली सरासरी ११-१३ वर्षांत व मुलं सरासरी १३-१४ वर्षांत वयात येतात. क्वचित एखादा मुलगा किंवा मुलगी लवकर (उदा.नवव्या किंवा दहाव्या वर्षी) वयात येते. (जर १६वं वर्ष संपलं तरी मुलगा/मुलगी वयात आली नसेल, तर अॅलोपथिक डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.) वयात येताना मुला/मुलींच्या शरीरात विविध शारीरिक व मानसिक बदल होऊ लागतात. त्यांचा लैंगिक पैलू जन्म घेतो व लैंगिक इच्छा उत्पन्न होऊ लागतात. शारीरिक बदल मुलांमधील शारीरिक बदल मुलींमधील शारीरिक बदल स्तनं वाढतात. वीर्यनिर्मिती सुरू होते. मासिक पाळी सुरू होते. जननेंद्रियांच्या आकारात वाढ होते. जननेंद्रियांच्या आकारात वाढ होते. उंची वाढते. उंची वाढते. खांदे रुंदावतात शरीराला गोलाई येते. स्नायू बळकट होतात. आवाज फुटतो. काखेत, जननेंद्रियांभोवती केस येतात. काखेत, जननेंद्रियांभोवती केस येतात. दाढी / मिशा येतात. पुरुषांची जननेंद्रिय वृषण (गोट्या) पुरुषांना दोन वृषण असतात. हे वृषण एका त्वचेच्या पिशवीत (वृषणकोष) असतात. दोन्ही वृषण समान आकाराचे नसतात. एक वृषण दुसऱ्यापेक्षा थोडं मोठं असतं व थोडं खालती लोंबतं असतं. वयात आल्यानंतर वृषणात टेस्टोस्टेरोन हे लैंगिक संप्रेरक तयार होतं. वयात आल्यावर या संप्रेरकामुळे स्नायू बळकट होणं, आवाज बसणं हे बदल होतात. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १९