पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुलगा मुलगी स्तन छाती ढुंगण लिंग वृषण/ गोट्या मायांग -ढुंगण N -- FREMPERH लहान मुलांचं वर्तन मूल जसजसं वाढायला लागतं तसतसं ते हातापायाच्या आधारे जमिनीवर सरकायला लागतं. कुतूहलापोटी हाताला लागेल त्या गोष्टींशी खेळायला लागतं. आपल्या शरीराच्या विविध भागांना स्पर्श करायला लागतं. या टप्प्यात काही पालकांना आपल्या मुला/मुलींच्या वर्तनाबद्दल काळजी वाटायला लागते. “माझी २ वर्षांची मुलगी पालथं पडून जमिनीवर जननेंद्रिय घासते. काही वेळा तर अगदी पाहुण्यांसमोर हे प्रदर्शन होतं. एवढ्या लहान वयात हे लैंगिक वर्तन कसं काय?" किंवा "माझ्या ३ वर्षांच्या मुलाने एका ३ वर्षाच्या मुलाचं लिंग तोंडात घेताना मी पाहिलं. माझा मुलगा समलिंगी आहे का?" किंवा "माझ्या मुलीनं परवा एक खडू तिच्या गुदात घालायचा प्रयत्न केला. तिला आत्तापासून सेक्स आला का?" अशा त-हेचे अनेक प्रश्न पालकांना भेडसावतात. म्हणून लहान मुला/मुलींच्या वर्तनाचा अचूक अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. < स्पर्श लैंगिक इच्छा व लैंगिक सुख उपभोगण्याची परिपक्वता वयात आल्यावरच मुला/मुलींमध्ये येते. लैंगिक इच्छा व लैंगिक सुखाकडे प्रौढ व्यक्ती ज्या नजरेनं बघतात, त्या कृतींना अर्थ लावतात तसा अर्थ लहान मुलांना अजिबात अवगत नसतो. जननेंद्रियाशी खेळणं हे त्यांच्यासाठी इतर अवयवांबरोबर खेळण्यासारखं असतं. जशी हाताची बोटं, पायाची बोटं लहान मुलं खेळण्यासाठी वापरतात, तसंच १४ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख