पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारांश - निसर्गाने दिलेले लैंगिक पैलू - आपलं लिंग, लिंगभाव व लैंगिक कल व संस्कृतीतून आलेल्या लैंगिक पैलूंवरचं नियंत्रण व आपल्यावर कळत नकळत पडणाऱ्या विविध प्रभावांतून आकार घेणारे आपले लैंगिक अनुभव या सगळ्यांचा संगम प्रत्येक व्यक्तीची लैंगिकता ठरवते. समाजाने काही समान संस्कार, नियंत्रणं सर्वांवर लादली असली तरी प्रत्येकाची स्वतंत्र शारीरिक व मानसिक घडण असते, प्रत्येकाला येणारे अनुभव वेगवेगळे असतात, त्या अनुभवांचा अर्थही आपापल्यापरीने लावला जातो. म्हणून या सर्वांतून साकार होणारी आपल्या प्रत्येकाची लैंगिकता काही बाबतीत तरी विशिष्ट बनते. या पैलूंमध्ये अजून एक भर पडते ती म्हणजे काळाची. आपल्या लैंगिकतेबद्दलची सामाजिक दृष्टी व नियंत्रण हे त्या त्या काळाच्या ज्ञानावर, विचारांवर, मानवाधिकारांच्या समजुतींवर व वैदयकीय/तंत्रज्ञानाच्या विकासावर अवलंबून असते. कालांतराने जसजशी सामाजिक नियंत्रणं बदलतात तसतशी आपली लैंगिकतेबद्दलची दृष्टीही बदलत असते. जिथे अज्ञान आहे, व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व दिलं जात नाही, तिथे लैंगिकतेवर नियंत्रणं जास्त दिसतात. तिथे शारीरिक व मानसिक पातळीवर लैंगिक अत्याचार जास्त होतात. अशी उदाहरणं आपल्याला राजरोस दिसतात. स्त्रियांवरचे अत्याचार असो, नाहीतर समलिंगी पुरुषांवरचे अत्याचार असो. एखादया व्यक्तीने केलेल्या अन्यायाचं अनुकरण चटदिशी इतरजण आपल्या सोयीनुसार करू लागतात. लवकरच तो अन्याय एक रिवाज बनतो, आपल्या संस्कृतीचा एक भाग बनतो. या पायंड्यातूनच 'बायकी' हा शब्द अवहेलनेचा बनतो. हिजडा ही एक हीन . जात बनते. असे 'चांगले/वाईट' शब्द बनले की प्रत्येकाची समाजमान्य चौकटीत बसायची धडपड सुरू होते, त्यांची इच्छा असो वा नसो, त्यांना जमो वा न जमो. आपण कसे चांगले आहोत, समाजाचं हित जपण्यासाठी कसे उतावीळ आहोत याचा पुरावा दाखवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती स्वत:हूनच आपलं स्वातंत्र्य देऊन टाकायची धडपड २४० मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख