पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

लैंगिक पैलू लिंग SER लिंगभाव लैंगिक कल. CORN व्यक्तीची लैंगिकता लैंगिक वर्तन सामाजिक वर्तन करते. विशिष्ट लोकांनी ठरवलेल्या विशिष्ट चौकटीत बसायची धडपड करू लागते. या चौकटीत बसायला असह्य त्रास होत असला तरी, आपण त्या चौकटीत किती सहज बसतो हे दाखवायचं ढोंग सुरू होतं. आपण त्यात मावत नसलो, शरीराला, मानसिकतेला कितीही झळ पोहोचत असली, तरी आपण हा केविलवाणा प्रयत्न चालूच ठेवतो. याचं पुढचं पाऊल म्हणजे, प्रत्येकजण न्यायाधीश बनून, 'कोण या चौकटीत बसत नाही?" याची शहानिशा करू लागतो. अशा लोकांना शिक्षेचे फतवे काढू लागतो. साहजिकच जे लोक समाजमान्य लैंगिक चौकटीत बसत नाहीत, बसता येत नाही किंवा जमत असेल तरी बसत नाहीत, अशांवर सगळे तुटून पडतात. जो लैंगिक स्वातंत्र्य अनुभवायचं धाडस दाखवतो, त्याच्याबद्दल समाजात कमालीचा मत्सर निर्माण होतो. अशा व्यक्तींवर सामूहिकदृष्ट्या सूड उगवला जातो. इतरांमध्ये भीती घालण्याचा तो एक मार्ग असतो. या भीतीपोटी कोणीही आपली जीवनशैली जगायचं धाडस करत नाही. आपल्याला पडलेले प्रश्न, आपल्या वाटेला आलेल्या कुंचबणेला वाचा फोडायचा मार्ग उरत नाही. असं झालं की व्यक्तिस्वातंत्र्याचा, मानवी अधिकारांचा -हास होतो. अशा नियंत्रणातून लोकांची विविध वर्गांत विभागणी झाली आहे. भिन्नलिंगी समाजाचा एक गट ज्यात पुरुषांचा एक गट, स्त्रियांचा दुसरा गट, (त्या गटात - मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २४१