पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिजडा समाज . "हिजडा म्हणजे काय?" हा प्रश्न मला लैंगिकतेच्या बहुतेक कार्यशाळांत विचारला जातो. मी विचारतो, की "तुम्ही या शब्दाचा काय अर्थ लावता?" तर उत्तर “पुरुष व स्त्री दोघांचे अवयव नसलेले", "पुरुष पण नाही, स्त्री पण नाही", “साडी घालणारे पुरुष". "म्हणजे नेमकं काय?" असं विचारलं तर प्रशिक्षणार्थी ओशाळतात व सांगतात, की “आम्हांला माहीत नाही. हा शब्द आम्ही फक्त चिडवायला वापरतो." सर्वांनी रस्त्यात साडी घातलेले पुरुष पाहिले आहेत. प्रत्येक दुकानापाशी जातात, पैसे मागतात. टाळ्या वाजवतात. अनेकांचे कपडे भडक असतात. स्त्रीचा पोशाख व पुरुषी देह, याची अनेकांना भीती वाटते. मलाही वाटायची. मी 'हमसफर ट्रस्ट'मध्ये जायचो तेव्हा मी पहिल्यांदा हिजड्यांशी बोललो. सुरुवातीला त्यांच्याबरोबर बसायला, त्यांच्याशी बोलायला खूप संकोच वाटायचा. नंतर हा संकोच गेला. वरवरचे फरक बाजूला ठेवून मी त्यांना माणूस म्हणून ओळखायला लागलो. माझे पूर्वग्रह हळूहळू दूर झाले. हिजडा म्हणजे काय? हिजडा हा मुख्यतः ट्रान्सजेंडर व्यक्तींचा समाज आहे. या व्यक्ती शारीरिकदृष्ट्या पुरुष आहेत पण यांचा लिंगभाव स्त्रीचा आहे. हे जन्माने मुलगे असतात. त्यांना मुलांची जननेंद्रियं असतात. वयात आल्यावर लैंगिक इच्छा झाल्यावर इतर पुरुषांसारखी यांच्या लिंगालाही उत्तेजना येते, हस्तमैथुन केल्यावर वीर्यपतन होतं. क्वचित एखाद-दुसऱ्या व्यक्तीची जननेंद्रियं जन्मतः पूर्णपणे पुरुषाची किंवा स्त्रीची घडलेली नसतात (बघा, सत्र-'जननेंद्रियातील वेगळपण'). अपवादात्मक एखादया स्त्रीची हिजड्यात 'रित' असते. तिला 'बेटी' म्हटलं जातं. पण ती खऱ्या अर्थी हिजडा म्हणून समजली जात नाही. ट्रान्सजेंडर व्यक्तींबद्दलची वैदयकीय माहिती भारतीय समाजाला खूप नवीन मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २३५