पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान मुला/मुलींचा वेश्याव्यवसाय काही ठिकाणी लहान मुला/मुलींचं लैंगिक शोषण करण्यासाठी पर्यटन होतं. अनेक पाश्चात्त्य देशात लहान मुलां/मुलींचं लैंगिक शोषण होऊ नये म्हणून अत्यंत कडक कायदे आहेत. त्यामुळे तिथल्या काही व्यक्तींना इच्छा असूनही त्यांच्या देशात लहान मुला/मुलींचं लैंगिक शोषण करायचं धाडस नसतं. ज्या देशात पैसे देऊन लहान मुलां/मुलींबरोबर आपल्याला पाहिजे ती लैंगिक आवड पुरी करता येईल, असे देश ते शोधतात. श्रीलंका, बांगलादेश व काही प्रमाणात भारतात अशी मंडळी येतात. आपल्या इथे लहान मुलां/मुलींचं लैंगिक शोषण हा गुन्हा असला तरी पकडलं जाण्याची शक्यता खूप कमी असते. ज्यांच्या घरी दिवसातून एक वेळ जेवायची वानवा आहे, ज्यांनी कळायला लागल्यापासून, तुम्ही मिळवा नाहीतर उपाशी मरा' हीच जीवनशैली बघितली आहे, तिथे अनेक मुला/मुलींना चोऱ्यामान्य करणं, भीक मागणं किंवा वेश्याव्यवसाय करणं हे पर्याय सहज उपलब्ध होतात. काहींना अनुभवांनी कळू लागतं तर काहींना त्यांचे मित्रमंडळी रस्ता दाखवतात. काहीजण दलालांच्या हाती लागतात. काही गिन्हाइकांची लहान मुलां/मुलींची पसंद असल्यामुळे ते अशा मुला/मुलींच्या शोधात असतात. काही गि-हाइकांचा समज असतो की या मुला/मुलींना एसटीआय/एचआयव्हीची लागण झालेली नसणार, म्हणून त्यांच्याबरोबर असुरक्षित संभोग केला तरी चालेल. या गैरसमजुतीमुळे जर गिहाइकाला एसटीआय/एचआयव्हीची लागण असेल तर ती या मुला/मुलींना होण्याची शक्यता असते. याच्यावर काय उपाय करायचा? या मुलां/मुलींना सुरक्षित लैंगिक संभोगाची माहिती देणं, निरोध पुरवणं, सामाजिक संस्थांना करता येत नाही. असं केलं तर संस्थांनीच या मुला/मुलींना वेश्याव्यवसायात आणलं किंवा त्यांना हा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिलं, असा आरोप होईल यात कोणतीही शंका नाही. याच्यामुळे या नाजूक विषयाला कोणी हात घालत नाही. लहान मुला/मुलींचा वेश्याव्यवसाय, हे एक विदारक सत्य आहे. त्यांचं लैंगिक शोषण होऊ नये म्हणून कायदयानं व समाजातील सर्व घटकांनी शर्थीचे प्रयत्न करणं आवश्यक आहे. २३४ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख