पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
  • 'ब्रॉथेल' चालवणं गुन्हा आहे.
  • सार्वजनिक ठिकाणी (उदा.शाळा, धार्मिक स्थळं इत्यादी.) व त्याच्या

२०० मीटर्सच्या आसपास वेश्याव्यवसाय करणं गुन्हा आहे.

  • वेश्यांनी रस्त्यातून किंवा घराच्या दारातून, खिडकीतून गि-हाइकाला

खुणावणं, हटकणं गुन्हा आहे. समाजाचा दृष्टिकोन "बिंदूमाधव, तुला त्रास होत नाही का हे सगळं अवतीभोवती बघून?" किंवा "आम्हांला यांच्यासाठी काहीतरी करायचंय, यांना यातून बाहेर काढायचयं" अशा त-हेची सहानुभूतीची वक्तव्य मी अनेक वेळा ऐकली आहेत. पुनर्वसनाच्या नावाखाली वेश्यांना गाडीतून घरी पाठवलं व त्या पुढच्या महिन्यात परत आल्या, तर नवल काय? घरचे त्यांना परत घेणार का? बाहेर स्वत:च्या पायावर उभं राहण्याची कौशल्यं त्यांच्या अंगी आहेत का? मग काय करणार? हे असलं सत्कर्म पाहिलं की 'भीक नको पण कुत्रा आवर' म्हणायची वेळ येते. तर दुसरीकडे काही स्त्रीवादी विचारसणीच्या व्यक्ती/संस्था लग्न झालेल्या बायकांपेक्षा वेश्या जास्त सक्षम आहेत असं सुचवतात. या दोघांनाही वास्तवाचं भान नसावं ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. वेश्याव्यवसायात जबरदस्तीनं आणलं जाऊ नये हे निश्चित, पण ज्यांना दुसरा इलाज नाही किंवा कोणत्याही इतर कारणानं ज्या व्यक्ती स्वतःहून धंदा करू इच्छितात त्यांना इज्जतीनं धंदा करता आला पाहिजे या मताचा मी आहे. - सेक्स टुरिझम सेक्स टुरिझमचा अर्थ संभोगाच्या अनुभवासाठी पर्यटन करणं. आपल्या घरच्या जोडीदाराचा कंटाळा आला म्हणून किंवा नावीन्य शोधायची इच्छा म्हणून अनेकजण (यातले बहुतांशी पुरुष आहेत) लैंगिक उपभोगासाठी पर्यटन करतात. गेल्या काही वर्षांत हे पर्यटनाचं प्रमाण वाढू लागलं आहे. काही विशिष्ट राज्यांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसतं - तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, गोवा, महाराष्ट्र व राजस्थान. काही पर्यटक भारतातील आहेत तर काही विदेशी. काहीजण धार्मिक उत्सव, जत्रा, पालखी इत्यादींचं निमित्त साधून लैंगिक पर्यटन करतात. अशा वेळी वेश्याव्यवसाय तेजीत असतो. पुण्यातील एक पुरुषवेश्या मला म्हणाला, “दरवर्षी उत्सवाच्या वेळी माझी एका रात्रीत दोन आठवड्यांची कमाई होते." अशा पर्यटनात जर निरोधचा वापर झाला नाही तर एसटीआय/एचआयव्ही झपाट्यानं पसरण्याची शक्यता असते. " मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २३३