पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काही पुरुषवेश्या सज्जन आहेत तर काही चोर आहेत. गिहाइकावर मुखमैथुन करताना त्यांचं लक्ष नसताना त्यांच्या उतरवलेल्या पँटमधून पाकीट, मोबाईल मारण्याचे प्रकार घडतात. काही वेळा गळ्यातील सोन्याची चेनसुद्धा सफाईदारपणे लांबवली जाते. बहुतेक लुबाडलेले गि-हाईक पोलिसात जात नाहीत. या नाण्याची दुसरीही बाजू आहे. काही गि-हाईकं पुरुषवेश्यांवर जबरदस्ती करतात. संभोग झाल्यावर मारहाण करतात व त्यांना लुबाडतात. धंदयाच्या इलाक्याच्या आसपासचे गुंड पुरुषवेश्यांना मारहाण करतात. पोलिसांचीही वक्रदृष्टी असते. पुरुषवेश्यांमध्ये सुरक्षित संभोगाचं प्रमाण कमी आहे. काही पुरुषवेश्या एचआयव्हीसंसर्गित आहेत. एसटीआयची लक्षणं दिसली तरी अनेकजणांना वैदयकीय सुविधा घ्यायला संकोच वाटतो. डॉक्टर आपल्याला वाईट वागणूक देतील ही भीती असते. छुपा धंदा करणाऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित संभोगाबद्दल माहिती देणं, निरोध पुरवणं, केवाय' जेली (वंगण) पुरवणं हे माझ्या 'समपथिक ट्रस्ट' सारख्या संस्थांसमोर एक मोठं आव्हान आहे.

वेश्याव्यवसाय व कायदा भारतात भिन्नलिंगी वेश्याव्यवसायाला बंदी नाही. स्त्री व पुरुष दोघंही वेश्याव्यवसाय करू शकतात. बंदी नसली तरी वेश्याव्यवसायावर नियंत्रण असावं व वेश्याव्यवसायाच्या नावाखाली स्त्रिया किंवा लहान मुला/मुलीचं लैंगिक शोषण होऊ नये म्हणून सरकारने 'इममॉरल ट्रॅफिक प्रिव्हेंशन अॅक्ट, १९८७' व भारतीय दंडविधान संहितेअन्वये वेश्याव्यवसायावर काही निर्बंध घातले आहेत. हे कायदे वेश्यांना किंवा त्यांच्या गि-हाइकांना त्रास देण्यास निर्माण केलेले नाहीत. या कायदयांची थोडक्यात माहिती पुढे दिली आहे. १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलींनी वेश्याव्यवसाय करण्यास बंदी आहे.

  • कोणत्याही १८ वर्षांखालील व्यक्तीला वेश्याव्यवसायासाठी विकणं/

विकत घेणं गुन्हा आहे (भा.दं.सं. ३७२/३७३).

  • जबरदस्तीनं कोणालाही वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणं गुन्हा आहे.
  • स्त्री/पुरुषवेश्यांना वेश्याव्यवसायासाठी विकणं/विकत घेणं गुन्हा आहे.

(त्या स्त्री/पुरुषांची या व्यवहारास संमती असली तरीसुद्धा). एखादया व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीच्या वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या पैशांतून स्वत:चा उदरनिर्वाह करणं गुन्हा आहे (उदा. दलाली करणं गि-हाइकाला वेश्या पुरवण्याचं काम करून पैशाचा हिस्सा घेणं). जर बायको वेश्याव्यवसाय करून नवरा तिच्या पैशांचा उपभोग घेत असेल तर तो

- गुन्हा आहे. २३२ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख