पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बहुतेक वेळा पुरुषवेश्याव्यवसाय रस्त्यावर चालतो. पंचवीस रुपयांपासून ते हजारो रुपये घेणारे पुरुष उपलब्ध होऊ शकतात. या व्यवसायातील काही भिन्नलिंगी आहेत (काही भिन्नलिंगी पुरुष आर्थिक मोबदल्यासाठी पुरुषाला सेवा देतात), काही उभयलिंगी आहेत, काही समलिंगी आहेत, काही अशिक्षित आहेत, तर काही उच्चशिक्षित आहेत. काही पैशांसाठी धंदा करतात तर काही कॉलेजमधील मुलं श्रीमंत जीवनशैली जगता यावी म्हणून धंदा करतात. काहीजण शर्ट-पँटवर धंदा करतात, काहीजण (काही ट्रान्सजेंडर्स) साडी घालून धंदा करतात. साडीवर राहणारे काही ट्रान्सजेंडर्स धंदा चांगला व्हावा म्हणून कृत्रिम स्तनं बसवून घेतात. बहुतांशी पुरुषवेश्या शर्ट-पँटवर असल्यामुळे त्यांना ओळखायला अवघड जातं. त्याला पारखी नजर लागते. त्या नजरेनं गि-हाइकानी पुरुषवेश्या निवडला की लॉजवर जातात. जर गि-हाईक गरीब असेल तर अंधाऱ्या जागेत जाऊन संग होतो. कॉल बॉईजची जाळी काही मोठ्या शहरांत कॉल बॉईजची जाळी आहेत. तासाचे अनेक हजार घेणारे कॉल बॉईज असतात. पुरुष किंवा स्त्री या दोघांनाही कॉल बॉईज उपलब्ध होऊ शकतात. कोणता पुरुष हवाय हे गि-हाईक फोटो अल्बममधून ठरवतो. असं एक जाळं चालवणाऱ्या मालकाला मी विचारलं ,"गि-हाईक चांगलं आहे का हे कसं ओळखतात?" तेव्हा ते म्हणाले, “आम्ही त्या गि-हाइकाला कोणाकडून रेफरन्स मिळाला हे विचारतो. त्या रेफरन्स देणाऱ्या व्यक्तीकडे या व्यक्तीबद्दल नीट विचारपूस करतो. कधीपासून तुमची ओळख आहे? किती विश्वासार्ह आहे? पूर्ण खात्री झाल्यावरच आम्ही त्याच्याशी बोलणी करतो. « काही मालिशवाले काही मालिश करणारे पुरुष वेश्याव्यवसाय करतात. मी काही वर्षांपूर्वी 'पाथफाईंडर इंटरनॅशनल' साठी सर्वेक्षण करत होतो तेव्हा माझ्या स्टाफनं काही मालिश करणाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मालिश करणारे लॉजवर मालिश करतात किंवा गि-हाइकाच्या घरी जाऊन मालिश करतात. मालिशबरोबर काहीजण लैंगिक सुख दयायचं काम करतात. गि-हाइकाबरोबर हस्तमैथुन, मुखमैथुन किंवा गुदमैथुन करतात. (काही गुंड व्यक्ती या मालिश करणाऱ्यांवर पाळत ठेवतात. ते गि-हाइकाला लॉजमध्ये नेऊन मालिश करायला लागले, की दरवाजा जोरजोरानं वाजवतात व गि-हाईक पुरुषाबरोबर संभोग करतोय असा आरडाओरडा करून गि-हाइकाकडून पैसे उकळतात. सर्वेक्षणाच्या वेळी आमच्या स्टाफला गि-हाईक समजून असे दोन गुंड त्यांच्या मागावर लागले.) मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २३१