पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मसाज पार्लरवर धंदा करणाऱ्या वेश्या काही मसाज पार्लर्समध्ये वेश्याव्यवसाय चालतो. अशा पार्लरची प्रसिद्धी ही 'वर्ड ऑफ माऊथ' नी (एकाकडून दुसऱ्याला कळतं) होते. येणाऱ्या गि-हाइकाचा अंदाज घेऊन लैंगिक सेवा सुचवली जाते. गि-हाइकाची तयारी असेल तर जास्त पैसे मोजून तिथली स्त्री गि-हाइकाच्या आवडीनुसार मुखमैथुन किंवा योनीमैथुन करते. पुरुषवेश्या स्त्रीवेश्याव्यवसाय व पुरुषवेश्याव्यवसाय या दोघांत फरक आहे. स्त्रीवेश्याव्यवसाय हा मुख्यतः आर्थिक मोबदल्यासाठी केला जातो. पण पुरुषवेश्याव्यवसायात नेहमीच आर्थिक गणित असेल असं नाही. काही वेळा मुख्य उद्देश लैंगिक सुखाचाही असू शकतो व आर्थिक मोबदला हा दुय्यम हेतू असू शकतो. उदा. जर एखादा पुरुष उभयलिंगी किंवा समलिंगी असेल व दुसरा एखादा पुरुष त्याच्यावर भाळला (व दोघांना संभोग करायची इच्छा असेल) तर दोन पर्याय असतात. एक तर लैंगिक संबंध फुकट करायचे किंवा आर्थिक मोबदला मागायचा. 'गे' अॅक्टिव्हिस्ट अशोक राव कवी म्हणाले, “काही पुरुषवेश्यांना वेश्या म्हणणं बरोबर नाही, कारण तो खऱ्या अर्थानं वेश्याव्यवसायं नसतोच. तो पुरुष हुशार असतो. आपलं डोकं वापरतो. जर आपल्याला आवडलेला पुरुष हाती लागला, त्याच्याबरोबर संग करायची इच्छा झाली व ते करण्यासाठी एखादी नोट मिळत असेल तर ती का घेऊ नये, असा विचार तो पुरुष करतो- Pleasure combined with business". त्यामुळे हा सौदा खूप फ्लेक्झिबल' असतो. काही वेळा एखादी व्यक्ती खूप आवडली तर फुकट केलं जातं. काही वेळा गि-हाईक पैसे न देता इतर मागांनी परतफेड करतं. उदा. एखादा रिक्षावाला/जीपवाला लिफ्ट देईल, तर एखादा दुकानदार मोबाईल रिचार्ज करून देतो. कोणी जेवायला घालतं, तर कोणी पुरुषवेश्याला बाजारात टी-शर्ट खरेदी करून देतो. हे सगळं करताना कोणालाही यांच्या नात्याचा गंध नसतो. या सगळ्यामुळे पुरुषवेश्याव्यवसाय व स्त्रीवेश्याव्यवसाय यांची तुलना होऊ शकत नाही. पुरुषवेश्याव्यवसायाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. पुरुष जे स्त्रियांना सेवा देतात व पुरुष जे पुरुषांना सेवा देतात. पुरुष जे स्त्रियांना पैशासाठी सेवा देतात, ते तुलनात्मक कमी आहेत, पण पुरुष जे पुरुषांना सेवा देतात, यांचं खूप मोठं प्रमाण आहे. फार थोडा पुरुषवेश्याव्यवसाय 'ब्रॉथेल' मध्ये चालतो. क्वचित वेळा शहरातल्या लाल बत्ती इलाकातल्या काही घरवाल्या किंवा इतर ठिकाणी काही घराचे मालक आपलं घर/जागा काही ठराविक पुरुषवेश्यांना गरजेपुरतं भाड्यानं देतात. पुरुषवेश्येला मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यातला एक हिस्सा घरवाली किंवा घरचा मालक घेतो. २३० मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख