पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देणार आहेत का मला काम?" हॉटेलमध्ये चहा पीत एक उतारवयाला आलेल्या ताई मला म्हणाल्या. कॉल गर्ल काहीजणी कॉल गर्लस म्हणून काम करतात. त्या रस्त्यावर दिसत नाहीत. त्यांचा दलाल त्यांना गि-हाईक शोधून देतो. गि-हाईक हॉटेलमध्ये उतरल्यावर दलाल कॉल गर्लला हॉटेलवर पाठवतो. काही वेळा दलाल मा स्त्रियांना विविध शहरांत नेऊन धंदा करवतात. घरी धंदा करणाऱ्या वेश्या काही स्त्रिया आपल्या घरीच मोजक्या गि-हाइकांबरोबर धंदा करतात. वेळी- अवेळी आपल्याकडे परपुरुष येतात याचा आपल्या शेजारच्यांना संशय येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. पैशासाठी, श्रीमंत जीवनशैली जगण्यासाठी किंवा मौजमस्ती म्हणून हा व्यवसाय केला जातो. बारबाला काही बारबाला वेश्याव्यवसाय करायच्या. बारमध्ये नाचायच्या. गि-हाईकं दारू पिता पिता नाच बघायची, त्यांच्यावर पैसे उधळायची. त्यांचा नाच बघायला जास्त गि-हाईक यायची, जास्त वेळ बसायची, जास्त प्यायची. बार मालकांसाठी ते आर्थिकदृष्ट्या फायदयाचं होतं. या स्त्रियांशी संपर्क साधून काही गि-हाईक त्यांच्याशी संग करायची. आपली तरुण पिढी या बारबालांच्या नादी लागून वाया जात आहे, काहीजणांच्या अशा भूमिकेमुळे या बारबालांच्या नाचावर बंदी घातली गेली. यातल्या काहींनी वेश्याव्यवसाय बंद केला नाही. तो आता छुप्या रीतीनं चालतो. बारबालांना जेव्हा बंदी नव्हती तेव्हा त्यांच्या लैंगिक आरोग्याबद्दल काही संस्था त्यांच्याबरोबर काम करत होत्या. बंदी आल्यानंतर काही संस्थांचे आरोग्य प्रकल्प बंद पडले. नर्तकी काही नर्तकी वेश्याव्यवसाय करतात. यांतील वेश्याव्यवसाय करणाऱ्या बायका आम्ही असं काही करतं नाही' असं भासवतात. लैंगिक आरोग्याबद्दल बोलायची यांना कमालीची लाज असते. सामाजिक संस्थांच्या आरोग्य कार्यकत्यांपासून दूर राहतात. त्यामुळे त्यांना वैदयकीय सुविधा पुरवणं अवघड होतं. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २२९