पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाडीतून अनोळखी ठिकाणी नेणार असेल, तर काही वेळा ती बाई सौदा करून अजून एका बाईला बरोबर घेण्याचा आग्रह धरते. याचे दोन उद्देश. एकतर अनोळखी पुरुषाबरोबर अनोळखी ठिकाणी जायचं असतं म्हणून भीती असते व दुसरं कारण आपण दुसऱ्या बाईला बरोबर घेतलं, तर तिचेही यात दोन पैसे सुटतात. उदया आपण उपाशी असलो तर ती आपल्याला एखादया श्रीमंत गिन्हाइकाबरोबर घेऊन जाईल ही अपेक्षा असते. एकदा सौदा ठरला की एक-दोन बाटल्या, चिकन बिर्याणी घ्यायची. मग ठरलेल्या लॉजवर जायचं. तिथे खाणं (पिणं जास्त) होतं व मग संग होतो. चांगलं गि-हाईक भेटलं तर थोडं त्याच्या गळी पडून बांगड्या, प्लॅस्टिकच्या चपला, जमलं तर एखादं लुगडं पदरी पाडून घेतलं जातं. नवरा/मुलं असतील तर त्यांना माहीत असतं का की घरातील स्त्री वेश्याव्यवसाय करते? काहींना माहीत असतं. त्यातले बहुतेकजण आपल्याला माहीत नाही असं दाखवतात, कारण त्या बाईच्या जिवावर घरची चूल पेटते याची जाणीव असते. इथे नीतिमत्ता परवडणारी नसते. अशाच त-हेचा व्यवसाय इतर शहरांमध्येही चालतो. काहीजणी शहरात रस्त्यावर वर्दळ कमी झाली की धंदयाला उभ्या राहतात. काहीजणी तोंडाला दुपट्टा गुंडाळून चेहरा झाकतात. ओळखीच्या व्यक्तीनं जरी पाहिलं तरी त्याला ती स्त्री ओळखता येत नाही. येणाऱ्या गि-हाइकाला चेहऱ्यावरून नाही, शरीरयष्टीवरून निवड करता येते. सौदा झाला की लगेचच त्या गि-हाइकाच्या गाडीतून जातात. जर जागा मिळाली नाही तर गाडीत संभोग होतो. काहीजणी ठरलेले ट्रक नाके, ढाब्यावर धंदा करतात. काहीजणी ट्रक ड्रायव्हरबरोबर या गावातून त्या गावाला जाताना वाटेत त्याच्याशी संग करतात. पुढच्या नाक्यावर उतरतात व तिथे परतीचे गि-हाईक शोधतात. अनेक वेळा ट्रकमध्ये किंवा आडोशाच्या ठिकाणी संभोग करावा लागतो. ड्रायव्हर जर प्यायलेला असेल तर हिंसा, लैंगिक अत्याचार होण्याची शक्यता असते. खेडेगावात वेश्याव्यवसाय करणाऱ्या काही बायका दूरवरच्या गावी जाऊन बाजारच्या दिवशी धंदा करतात. काहीजणी टोपली घेऊन काहीतरी विकायला घेऊन येतात. गि-हाईक मिळालं की ओळखीच्या व्यक्तीपाशी टोपली ठेवून गि-हाइकाबरोबर जातात. सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसाय करण्यास मनाई असल्यामुळे कधीकधी रस्त्यावर वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना पोलिस हाकलून देतात. काहींच्या वाट्याला दंडुके येतात, काहीजणींना पोलिस स्टेशनवर नेलं जातं, 'दुसरं काही काम का करत नाही?' म्हणून शिव्या खाव्या लागतात. “शिक्षण नाही, काही नाही. परिस्थिती अशी म्हणून करते. या वयाला आता या वेटरचं काम करू का? आणि हे मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २२८