पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म्हणाल्या, “बहिणीच्या लग्नासाठी पैसे हवे म्हणून भाऊ आला होता...नी इकडून तिकडून ते मिळवून दिले. पण लग्नाला तिला बोलावलं नाही." ते कर्ज व त्यावरचं व्याज चुकवण्यात आयुष्य खर्च होतं. अनेकांना या व्याजाचं गणित कळतच नाही. वय झालं की हळूहळू धंदा कमी होतो. जर एखादा असाध्य आजार झाला तर त्या बाईला निर्दयपणे घराबाहेर काढलं जातं. गाडीत बसवून गावी पाठवलं जातं. एका ताईच्या भाषेत, 'रुपयातले चाराणे' एवढ्याच बायका जेवढी कमाई करता येईल तेवढी करायचा प्रयत्न करतात व वय खूप झालं की गावी जातात. तिथे त्यांचं काय होतं कोणाला माहिती नाही. बाकीच्यांचं काय? काहीजणी इथेच धुणंभांडीसारखी घरकामं करतात. बाकी सर्व रस्त्यावर येतात व रस्त्यावरच डोळे मिटतात. जोवरी पैसा तोवरी बैसा.. , रस्त्यावर धंदा करणाऱ्या वेश्या (स्ट्रीटबेस्ड सेक्स वर्कर्स) स अनेक स्त्रिया लॉजवर, ढाब्यावर, राष्ट्रीय महामार्गावर, एसटी स्टँडवर, बाजारच्या दिवशी बाजारात धंदा करतात. परत बुधवार पेठेचं उदाहरण घ्यायचं झालं, तर इथल्या सगळ्याच धंदा करणाऱ्या इथे राहणाऱ्या नाहीत. काही इथे फक्त धंदयासाठी येतात. गल्लीच्या आडोशाला उभ्या राहतात, उभं राहून पाय दुखायला लागले, की रस्त्याच्या बाजूला बसतात. प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा कागदात बांधून खायला आणलेलं असतं. बरोबर एक प्लॅस्टिकची पाण्याची बाटली. दुपारी आडोशाला सावलीत बसून जेवतात. अनेकींच्या मनात काळजी असते की कोणी ओळखीच्यांनी पाहिलं तर? असं अधूनमधून होतंही. मग "मी इथे 'पॅरामेडीक म्हणून काम करते," असं काहीतरी खोटं सांगितलं जातं. यातल्या काही विधवा आहेत, काहींच्या नवऱ्यांनी त्यांना सोडलेलं आहे. पैशासाठी गरजेच्या काळात धंदा करतात. एकटी बाई असेल, तिच्याकडे लहान मुलं असतील, तर तिनं मुलांना कसं पोसायचं? काहींचे नवरे आहेत पण ते काहीही करत नाहीत, तर काहीजणींना भवांनीच धंदयाला लावलेलं आहे. यांना धंद्यासाठी जागेची अडचण असते. गि-हाईक मिळाल्यावर त्याला घेऊन लॉजवर जावं लागतं. त्यामुळे एका दिवसात जास्त गि-हाईक करता येत नाहीत. काही वेळा एखादं गि-हाईक मिळालं तरी भरपूर अशी स्थिती होते. इथल्या काही मोजक्याजणी माझ्या माहितीच्या आहेत. क्वचित संस्थेत बसायला येतात. आपली गा-हाणी सांगतात. खूप अडचण असेल तर एखादी १०० रुपयाची नोट उसनी मागतात. न चुकता आठवणीनं मिळकत झाली की परत करतात. अशी आर्थिक ओढाताण असली, की 'माझं कस्टंबर तू का घेतलंस' म्हणून आपापसात भांडणं होतात. गिन्हाईक भेटलं की त्याच्याबरोबर जायचं. गि-हाईक ओळखीचं नसेल व तो मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २२७