पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काही महाराष्ट्रातल्या आहेत, काहीजणी कानडी आहेत, काही तेलुगु आहेत, तर काही नेपाळी. काही बायकांना मातृभाषा सोडली तर कोणतीच भाषा येत नाही. उदा. अनेक नेपाळी बायकांना नेपाळीशिवाय दुसरी कोणतीच भाषा येत नाही. त्यांच्याशी संवाद साधणं अवघड जातं. काही घरवाल्या तर त्यांना वाड्याच्या बाहेरसुद्धा जाऊ देत नाहीत. त्यांच्यावर बारीक पाळत ठेवतात, इतरांच्या तुलनेत यांना सर्वात कमी मोकळीक मिळते. इथे आलेल्या बहुतेकजणींचं एकं स्वप्न असतं, संसार करायची इच्छा असते. इथल्या काही तरुणीचं एखादया गि-हाइकावर किंवा जवळपासच्या एखादया पुरुषावर प्रेम बसतं. अशी अनेक प्रेमप्रकरणं चालू असतात. आमच्याकडे चहा घेऊन येणाऱ्या दोन मुलांच्या हातावर आपल्या आवडत्या मुलीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी केलेले ब्लेडचे वार. अशा तरुणांचे व त्या मुलींचे रूसवेफुगवे. चहा ओतताना, “सामान लाथा मारतं, जवळ येऊ देत नाही" अशी चहावाल्या पोराची कुरकुर. मग घरवालीच्या नावानं शिव्या कारण ती अशा आशिकांना हाकलून देते, पोलिसात तक्रार करायची धमकी देते. काहीजणींचे प्रियकर आहेत. काहीजणींचा एकच (रेग्युलर पार्टनर), तर काहीजणींचे बदलते प्रियकर. थोडेच प्रियकर साथ देणारे असतात. अनेकजण भावनिक, शारीरिक व आर्थिक शोषण करणारे. गरज लागली की पैसे मागतात, परत करण्याचं नाव नसतं. रेग्युलर पार्टनर' बरोबर निरोधचं अंतर ठेवलं जात नाही. कारण "मग मी आणि तुझा गि-हाईक यात फरक काय?" हा त्याचा ठरलेला सवाल असतो. (अनेक वेळा गि-हाईक पैसे देतो व मालक देत नाही एवढा एकच फरक असतो. पण हे त्याला ठणकावून सांगायचं सक्षमीकरण झालेलं नसतं.) म्हणून त्याच्याबरोबर निरोध वापरण्याचं प्रमाण नगण्य. (जर अनावश्यक गर्भधारणा झाली तर गर्भपात करतात.) जर त्याला एसटीआय/एचआयव्ही झालेला असेल तर त्या बाईला तो आजार होण्याचा मोठा धोका असतो. काहींना मुलं हवी असतात. मूल झाल्यावर ते लहान असताना त्याला सेवाभावी संस्थेच्या पाळणाघरात ठेवलं जातं. मुलं मोठी झाली की अनेकजणांना हॉस्टेलवर पाठवलं जातं. मुलं/मुली तारुण्यात आली की काहीजणी आपल्या मुला/मुलींची लग्न लावतात. लग्न झालं की काहींना आपल्या आईशी ओळख ठेवायची इच्छा नसते. ही दृष्टी मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसते. आईनं कितीही कष्ट करून मुलाला वाढवलं असलं तरी एकदा लग्न झालं, की बहुतेकजण दूर जातात. आईशी ओळख ठेवत नाहीत. पण अशीही उदाहरणं आहेत, की जिथे मुलगा आईला घेऊन निघून गेलेला आहे. अनेक बायकांनी घरवालीकडून कर्ज घेतलेलं असतं. कधी स्वतःसाठी, कधी प्रियकराला आर्थिक आधार देण्यासाठी, तर कधी घरी पाठवण्यासाठी. एक ताई २२६ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख