पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" " 7 विचारलं, की "बोलता येत नाही म्हणून यांना कमी भाव मिळतो का?" मला सांगण्यात आलं, की "भाव हा दिसण्यावर, वयावर असतो. त्यांना बोलता, ऐकता येतं का याच्यावर नसतो." काहींना मानिसक आजार आहेत. फोकस ग्रुपमधल्या एक ताई म्हणाल्या, -ला खायला दिलं तर खायची नाही, तसंच बसायची. खायला लागली की नुसतंच खात राहायची. कशाचंच भान नाही. निरोध वापरला किंवा नाही याच्याशी मालकिणीला काहीही देणंघेणं नव्हतं. एकीला तर मालकीण बांधून ठेवायची.' सहेली संस्थेच्या संचालिका तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, “यातील थोड्याजणींना इथे यायच्या वेळीच मानसिक आजार असतो. पण अनेक जणींच इथे आल्यावर मानसिक आरोग्य खालावतं, नैराश्यानं अनेकजणी ग्रासतात. अनेकांना इथे आल्यावर मानसिक आजार होतो." विशेषतः ज्यांना फसवून आणलं गेलं असेल त्यांना फार मोठा मानसिक धक्का बसण्याची शक्यता असते. आपल्या विश्वासातील व्यक्तीने, मग तो भाऊ असो, काका/मामा असो, काकू/मामी असो किंवा नवरा' असो, ही फसवणूक केली तर त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे खचतो. माणुसकीवरचा विश्वास उडतो. या धक्क्यातून नैराश्य येते. कोणाला सांगणार? काय सांगणार? जरी कोणी सोडवलं व ती परत घरी गेली तर घरचे स्वीकारणार नाहीत, याची कल्पना असते. साहजिक आहे की अशा परिस्थितीत स्वतःच्या आरोग्याकडे किती लक्ष दिलं जाणार? 'आता काय फरक पडतो?' असा काहीजणींचा दृष्टिकोन बनतो. अशी मानसिक अवस्था असलेली स्त्री, गि-हाइकानं निरोध वापरलाच पाहिजे ही ठाम भूमिका घेण्याइतकी सक्षम असणार का? तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, “यांच्यासाठी तज्ज्ञ समुपदेशक व मानसोपचारतज्ज्ञांची खूप मोठी गरज आहे. यांच्या मानसिक आरोग्याचा पैलू आजवर पूर्णपणे दुर्लक्षित राहिला आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.' पूर्वीच्या अनेकजणी देवदासी म्हणून इथे आल्या. नवीन मुलींत देवदासी दिसत नाहीत. आता नवऱ्याने इथे आणून सोडलेल्या, प्रियकराने फसवून आणलेल्या दिसतात. नाबालिक मुली आणल्या आहेत हे कळलं की पोलिसांची धाड पडते, घरमालकिणीला/दलालांना अटक केली जाते. काहीजणी मित्र/मैत्रिणींच्या ओळखीनी स्वत:हून आलेल्या असतात, काही घरातल्याच असतात. आई धंदयात होती, मुलगीही धयांत आलेली असते. सहेलीच्या फोकस ग्रुपमधल्या एकजण म्हणाल्या, “आमच्या पाहण्यात एक- अशीही उदाहरणं आहेत की ज्यांचं लग्न झालेलं आहे. त्या बाहेरच्या राज्यातील आहेत. घरी नवरा, सासू-सासरे आहेत. त्या इथे राहून धंदा करतात व महिन्याच्या महिन्याला हजारो रुपये घरी पाठवतात. स्वत:ची काळजी घेतात, मुलं होऊ नयेत म्हणून कुटुंब नियोजनाची साधनंही वापरतात. " -दोन मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २२५