पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गि हाइकानी मोबाईल खिशात टाकला. कळायच्या अगोदर तो निघून गेला होता." जसे काही गि-हाईक तशा काही वेश्या. त्या गिहाइकाचं लक्ष नसताना गि-हाइकाचे पैसे मारतात. लक्षात आल्यावर, गि-हाइकाने त्या वाड्यासमोर उभं राहून केलेली शिवीगाळ अधूनमधून कानी पडते. पहाटे धंदा संपला की झोपतात. उशिरा उठतात. काहीजणी दररोज अंघोळ करतात. मात्र काहींचा भर नुसता पावडर लावणं व सेंट मारण्यावर असतो, म्हणून त्वचेचे विकार जास्त दिसतात. वाड्यात स्वच्छता असली, मुलींना स्वच्छता शिकवली तर त्या जास्त सुदृढ राहतील व जास्त कमावू शकतील, ही व्यावहारिक जाण बहुतेक घरवालींना (मालकिणींना) नसते. त्यांचं लक्ष कमीत कमी त्रास घेऊन जास्तीत जास्त कमाई करणं. बहुतेकजणींना गुटखा, तंबाखू, दारू, बीडीची सवय आहे. रंगपंचमीला व महाशिवरात्रीला काहीजणी भांग पितात. सहेलीच्या 'फोकस ग्रुप' चर्चेत कळलं की क्वचित कोरेक्स पिणाऱ्याही बायका आढळतात. अनेक गिहाईकं पिऊन येतात. काही गि-हाईकं अफूची गोळी खाऊन येतात, बहुतेक सर्व बायका पितात. मी विचारलं, "बाई प्यायलेली असेल तर मग निरोध वापरण्याचं भान असतं का?" तर त्यावर उत्तर आलं की, “काहीजणींना कधीकधी निरोध चढवायची शुद्ध राहात नाही. काहीजणी एकदा दारू चढली की धंदा करत नाहीत. गि-हाईक आलं तर त्याच्या कंबरड्यात लाथ घालून हाकलून देतात." काही वेळा गि-हाईक जास्त पैशांचं आमिष दाखवतो. बिननिरोधचं 'बस' म्हणून आग्रह धरतो. जर त्या मोहाला वेश्या बळी पडली व गि-हाइकाला एसटीआय/एचआयव्हीची लागण असेल तर ती लागण त्या स्त्रीला होते. त्यामुळे काहीजणी एचआयव्हीसंसर्गित झालेल्या आहेत. एचआयव्हीची लागण आहे हे इतरांना कळलं तर आपल्याला वाळीत टाकतील या भीतीनं बाहेर बोलता येत नाही. त्यामुळे वेळोवेळी तपासणी करणं, विविध आजारांवरच्या उपचारात दिरंगाई होते. बहुतेकजणी फार शिकलेल्या नाहीत, शास्त्रीय दृष्टिकोन जवळपास नाही. मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा, करणी, उतारे यांच्यावर विश्वास. त्यांचं मन अॅलोपॅथिक डॉक्टरांकडे वळवणं इथल्या सामाजिक संस्थांच्या अनेक आव्हानांमधलं एक महत्त्वाचं आव्हान. पूर्वी जवळच्या सरकारी दवाखान्यात काही सरकारी डॉक्टरांनी यांना इतकी वाईट वागणूक दिली, की त्यांची अॅलोपॅथिक डॉक्टंराकडे जायची तयारीच नव्हती. हळूहळू 'राष्ट्रीय एड्स संशोधन केंद्र व इतर सेवाभावी संस्था वैदयकीय सेवा पुरवायला लागल्यापासून थोडा विश्वास परत येऊ लागला आहे. क्वचित काहींमध्ये शारीरिक विकलांगता आढळते. एक-दोघी मुक्या आहेत. यांना बरोबरच्या सहकारी सौदा करायला मदत करतात. फोकस ग्रुपमध्ये मी २२४ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख