Jump to content

पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इलाक्यात आहे. छोट्या गल्ल्या, रस्त्यावर कचरा व सांडपाणी, जुने मोडकळीस आलेले वाडे, यांतल्या काही वाड्यांमध्ये चालणारा वेश्याव्यवसाय. स्त्रिया नटूनथटून दारापाशी उभ्या राहतात. सकाळी अगदी मोजक्याच दिसतात. दुपारनंतर जास्त संख्या दिसते. पावडर, लिपस्टिक, सेंटचा भरपूर वापर. गि-हाईक नसेल तेव्हा दारावर येणाऱ्या व्यक्तींकडून गजरा, उदबत्ती, कपडे, लोणची यांची खरेदी. कान साफ करणाऱ्यांचा गल्लीत वावर, गि-हाइकांचे कान साफ करण्याचा त्यांचा धंदा. ऊन जरा कमी झालं, की पोरांची टोळकी गल्ल्या-गल्ल्यांतून फिरतात. सुट्टीचा दिवस असेल - गुरूवार किंवा रविवार - तर मात्र दिवसभर जत्रा असते. तरुण मुलं समोरच्या दुकानांच्या कट्ट्यावर तासन्तास बसून या मुलींकडे टक लावून बघत राहतात. हिला निवडू की तिला निवडू. नवखे तरुण लगेच ओळखू येतात. ते सहसा एकटे येत नाहीत. दोन-दोन मुलं हातात हात घालून (एकमेकांना बळ देण्यासाठी?) गल्ल्या फिरतात. एखाद्या माडीपाशी थांबतात. मुलींशी अर्ध्या मिनिटांत सौदा पक्का करतात व कोणी बघायच्या अगोदर झट्दिशी माडी चढतात. सौदा शंभर रुपयांपासून होतो. कोणत्या गि-हाइकाला कोणती सेवा हवी यावर दर अवलंबून असतो. गि-हाईक मुख्यतः लिंग-योनीमैथुन किंवा मुखमैथुन करायची इच्छा व्यक्त करतो. थोड्याजणीच मुखमैथुन करायला राजी होतात. जरी मुखमैथुन केला तरी इतरांना त्याच्याबद्दल सांगायला टाळतात. बहुतेकांना ते घाण, चुकीचं, शरमेचं वाटतं. काही गि-हाईक गुदमैथुन करायची मागणी करतात, काही गि-हाईक बाईनी आपल्या गुदात बोटं घालून आपल्याला सुख दयावं ही शिफारस करतात. याच्याव्यतिरिक्त स्तनांमध्ये, काखेत लिंग घालून संभोग करायची मागणी करतात. यातील संभोगाचे अनेक प्रकार हे गि-हाईक आपल्या बायकोबरोबर करायला लाजतो किंवा तिच्यासमोर आपण पुरुष म्हणून कमी वाटू म्हणून तिच्याबरोबर करत नाहीत. इथे त्यांची सुप्त इच्छा प्रकट होण्यास कमी अडचण येत असावी. सहसा दहा मिनिटांच्यावर गि-हाइकाला थांबू दिलं जात नाही. घरमालकिणीचं लक्ष असतं. काही घरांमध्ये किती पैसे मिळाले याची नोंद ठेवण्यासाठी विविध रंगांची प्लॅस्टिकची टोकन्स असतात. ती टोकन्स बायकांनी त्यांच्या ठरलेल्या डब्यात टाकायची असतात. आठवड्याने जेव्हा हिशोब होतो तेव्हा ती टोकन्स काढून हिशोब केला जातो. एक हिस्सा घरमालकिणीचा असतो. काही वेश्या व गिहाईकं प्रामाणिक आहेत, तर काही वेश्या व गिहाईक अप्रामाणिक असतात. जसं इतर व्यवसायात असतं तसंच. काही गिहाईक बायकांना लुटतात. सहेली संस्थेच्या फोकस ग्रुप चर्चेत एक ताई म्हणाल्या, “परवाची गोष्ट. काम झाल्यावर पैसे ठेवायला वळली तेवढ्यात & मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २२३