पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेश्या व्यवसाय "मी अजून सेक्स केला नाही. मला बुधवार पेठेत (लाल बत्ती इलाका) जायचंय. मी तुमच्याकडे येतो. मला निरोध व्यवस्थित कसा वापरायचा हे शिकवा. मग मी बुधवारात जातो.” हेल्पलाईनवर एका पुरुषाने मला सांगितलं. तो दोन आठवड्यांनी आला, लिंगाच्या मॉडेलवर निरोध कसा लावायचा हे शिकला. त्याच्या पुढच्या आठवड्यात त्याचा फोन आला, “मी गेलो होतो. निरोध कसा वापरायचा हे शिकवल्याबद्दल धन्यवाद." असं शहाणपण दाखवणारी व्यक्ती अपवादात्मकच मिळते. बहुतेकजण, नैसर्गिक वाटावं म्हणून, जास्त पैसे मोजून बिननिरोधचा संभोग करायचा वेश्येला आग्रह धरणारे. अनेक शहरांत व मोठ्या गावांत वेश्याव्यवसाय चालतो. लाल बत्ती इलाक्यात काम करणाऱ्या; रस्त्यावर फिरून गि-हाईक शोधणाऱ्या; ढाबा/राष्ट्रीय महामार्गावर धंदा करणाऱ्या; गरज लागेल तेव्हा बाजाराच्या दिवशी, जत्रेत जाऊन शरीरविक्री करणाऱ्या; घरात नवऱ्यानं आणून दिलेले गि-हाईक सांभाळणाऱ्या; काही बारबाला; कॉल गर्ल असे या व्यवसायाचे अनेक वर्ग आहेत. याच्या व्यतिरिक्त काहीजणी मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय करतात. नाचाचे कार्यक्रम करणाऱ्या काही नर्तकी वेश्याव्यवसाय करतात. हा व्यवसाय फक्त स्त्रियांपुरताच मर्यादित नाही. स्त्रियांसाठी सेवा पुरवणारे पुरुषवेश्या 'जीगोलोज' आहेत, समलिंगी वेश्याव्यवसाय करणारे अनेक पुरुष आहेत. बहुतेक पुरुषवेश्या रस्त्यावर, एसटी स्टैंड, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, समुद्रकिनाऱ्यावर गि-हाईक मिळवतात. यांच्याव्यतिरिक्त काही मसाज करणारे पुरुष वेश्याव्यवसाय करतात. मोठ्या शहरात कॉल बॉईजची जाळी आहेत. प्रत्येक वर्गाची कामाची पद्धत वेगळी, समस्याही वेगळ्या. स्त्रीवेश्या लाल बत्ती इलाक्यातील वेश्या (ब्रॉथेलवरच्या स्त्रीवेश्या) लाल बत्तीच्या इलाक्याचं उदाहरणं म्हणून मी पुण्याच्या बुधवार पेठेतील लाल बत्तीच्या इलाक्याबद्दल लिहीत आहे. माझी 'समपथिक ट्रस्ट' संस्था या २२२ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख