पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लॅपटॉप, कॉम्प्युटर मांडीवर घेऊन जे पुरुष जास्त काळ काम करतात त्यांच्या वृषणांना सातत्याने उष्णता लागून त्याचा पुरुषबीज निर्मितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. रेडिएशन 'क्ष' किरणांचा पुरुषांवर मोठ्या प्रमाणात/अनेक वेळा मारा झाला तर पुरुषबीजांची निर्मिती कमी होते. म्हणून रेडिओलॉजिस्टस्ना 'लेड अॅपरन' घालायला सांगतात. मोठ्या प्रमाणात/अनेक वेळा 'क्ष' किरणांचा मारा झाला तर स्त्रियांच्या प्रजनन आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. इतर प्रभाव गर्भार स्त्रियांना जर खूप मोठ्या आवाजाच्या सान्निध्यात राहावं लागलं, तर काहींना कमी वजनाची मुलं होऊ शकतात. कामाच्या दुसऱ्या व तिसऱ्या पाळ्यांमध्ये काम केलं की आपल्या नैसर्गिक झोपेच्या चक्राला तडा जातो. अर्धवट झोप होणं, डोक दुखणं, चिडचिड होणं असे परिणाम दिसतात. अशा परिणामांबरोबर, काही स्त्रियांना गर्भधारणा होण्यास जास्त कालावधी लागू शकतो.

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २२१