पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कीटकनाशकं भाजीपाला, शेतांवर अनेक कीटकनाशकांचा वापर होतो. एण्डोसल्फान, फॉस्फॅमिडॉन, मॅलथिऑन, डी.डी.टी., क्लोरपायरीफॉस इत्यादी. ही कीटकनाशकं काही अंशी भाज्यांत, धान्यांत मुरतात व ती खाल्ल्यावर आपल्या शरीरात जातात. जनावरांनी रसायनमिश्रित चारा खाल्ला की ती रसायनं जनावरांच्या शरीरात जातात. त्यांच्यातून ही रसायनं काही अंशी दुधात व अंड्यात येतात. कीटकनाशकं मुळातच कीटकांना मारण्यासाठी आहेत, म्हणजे ती काही अंशी विषारी असणार हे ओघानं आलंच. यांचा माणसांवर किती व कसा परिणाम होतो हे अनुभवातून हळूहळू कळू लागलं आहे. पूर्वी 'DECP' हे कीटकनाशक म्हणून वापरलं जायचं. अभ्यासात दिसून आलं की ज्या पुरुषांचा 'DECP' शी खूप संबंध येतो त्यांच्या पुरुषबीजांची संख्या घटते. माणसाच्या शरीरात गेल्यावर 'DDT' चं रूपांतर 'DDE' मध्ये होतं. संशोधनात दिसून आलं आहे की ज्या गर्भार स्त्रियांच्या रक्तात 'DDT' चं प्रमाण जास्त आहे, अशांना ९ महिने भरण्याआधी मूल होणं, कमी वजनाची मुलं होणं याची जास्त शक्यता असते. भारतातील एका सर्वेक्षणात दुधात 'DDT' चं मर्यादेपेक्षा जास्त प्रमाण दिसून आलं, तर भारतातील दुसऱ्या एका सर्वेक्षणात काही अंड्यांमध्ये 'DDT', 'HC', हॅपटॅक्लॉर एपॉक्साइडचं प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त दिसून आलं आहे. इतर काही संशोधनात, विविध कीटकनाशकांशी संबंध येणाऱ्या गर्भार महिलांचा गर्भ पडण्याशी, होणाऱ्या मुलांमध्ये 'क्रिप्टॉरचिडिजम' असण्याशी संबंध दिसून आला आहे. व्यवसाय 7 धातू काही धातू उदा. शिसं (लेड), क्रोमिअम, कॅडमियम, गंधक (मरक्युरी) यांच्या सततच्या संपर्कातून आपल्या प्रजनन संस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. उदा. रंगकाम करणाऱ्या काही व्यक्तींमध्ये शिसामुळे पुरुषबीजांच्या निर्मितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. उष्णता आपण करत असलेल्या कामाच्या अवतीभोवती असलेल्या तापमानाचा आपल्या प्रजनन आरोग्याशी संबंध आहे. पुरुषबीजं तयार व्हायला एक विशिष्ट तापमान लागतं. वृषणांना सतत उष्णता जाणवली तर पुरुषबीजांची निर्मिती कमी प्रमाणात होते. जे कामगार भट्ट्यांपाशी काम करतात, उदा. सिरॅमिक, स्टील इ. अशा काही व्यक्तींमध्ये पुरुषबीजांच्या संख्येत घट दिसू शकते. २२० मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख