पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इत्यादी. कदाचित पहिल्या मुलाच्या वेळी असा आजार झालेला नसतो किंवा तो मोठ्या प्रमाणात नसतो. पण पहिलं मूल झाल्यानंतर 'इन्फेक्शन' आजार होऊन/बळावून दुसऱ्या गर्भधारणेच्या वेळी अडचण उद्भवू शकते. जोडपं धरून चालत असतं की पहिल्यांदा मूल सहज झालं म्हणजे दुसऱ्यांदाही सहज होणार. तसं सहज होत नाही हे कळल्यावर पहिल्यांदा आश्चर्य, अपेक्षाभंग होऊन मग नैराश्य येण्याची शक्यता असते. प्रजननाचे संभोगेतर मार्ग इंद्रा युटरिन इनसेमिनेशन (IUI) जर पुरुषबीज गर्भाशयामुखातून गर्भाशयात पोहोचायला काही अडचण असेल तर हा मार्ग वापरला जातो. या मार्गात परिपक्व स्त्रीबीज स्त्रीबीजवाहिनीत आलं की पुरुषानं हस्तमैथुन करून मिळवलेल्या पुरुषबीजांवर प्रक्रिया करून (स्पर्म वॉश) ती पुरुषबीजं सिरिंजद्वारे थेट गर्भाशयात सोडली जातात. आशा असते की इथून ती पुरुषबीजं सरकत स्त्रीबीजवाहिनीत जाऊन एखादं पुरुषबीज स्त्रीबीजाला फलित करेल. इन व्हिट्रो फर्टिलायझेशन/टेस्ट ट्यूब बेबी (IVF) जर स्त्रीबीजवाहिनीत अडथळा असेल व शस्त्रक्रिया करून ती अडचण दूर होऊ शकणार नसेल तर स्त्रीबीज व पुरुषबीजाचं मीलन स्त्रीबीजवाहिनीत होणं शक्य नसतं. याला पर्याय म्हणून IVF चे तंत्रज्ञान वापरतात. पुरुषानं हस्तमैथुन करून मिळवलेल्या पुरुषबीजांवर प्रक्रिया (स्पर्म वॉश) केली जाते. स्त्रीची परिपक्व बीजं स्त्रीबीजांडातून बाहेर काढली जातात. ती एका डिशमध्ये ठेवून, प्रक्रिया केलेली पुरुषबीजं स्त्रीबीजांभोवती सोडली जातात. पुरुषबीजांनी काही स्त्रीबीजं फलित केली की ती काही काळ 'इन्क्युबेटर'मध्ये उबवली जातात. मग ती फलित बीजं त्या स्त्रीच्या गर्भाशयात रुजवली जातात. त्या स्त्रीला औषधं देऊन तिची मासिक पाळी बंद केली जाते. . इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन (ICSI) यात पुरुषाने हस्तमैथुन करून मिळवलेल्या पुरुषबीजांवर प्रक्रिया ('स्पर्म वॉश') केली जाते. स्त्रीची परिपक्व बीजं स्त्रीबीजांडातून बाहेर काढली जातात. प्रक्रिया केलेलं एक पुरुषबीज इंजेक्शनद्वारे एका स्त्रीबीजात घातलं जातं. अशी फलित केलेली स्त्रीबीजं काही काळ ‘इन्क्युबेटर'मध्ये उबवली जातात. नंतर ती फलित बीजं त्या स्त्रीच्या गर्भाशयात रुजवली जातात. त्या स्त्रीला औषधं देऊन तिची मासिक पाळी बंद केली जाते. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २१५