पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टिपणी : IVF व ICSI तंत्रज्ञान खूप खर्चिक असल्यामुळे एका वेळी २ किंवा ३ स्त्रीबीजं पुरुषबी जांबरोबर फलित करून गर्भाशयात रुजवली जातात. आशा असते की २-३ मधोल एक तरी गर्भ वाढेल. काही वेळा एकही वाढत नाही तर थोडी शक्यता असते की सगळी फलित स्त्रीबीजं गर्भ म्हणून वाढतील. एका प्रयत्नात यश येण्याची शक्यता खूप कमी आहे. म्हणून हा पर्याय वापरण्याआधी डॉक्टरांना 'टेक होम बेबी रेट' (म्हणजे गर्भधारणा होऊन मग प्रसूती होऊन जिवंत मूल होण्याची शक्यता) विचारावा. स्पर्म बँक जर एखादया पुरुषाच्या वृषणात पुरुषबीजं निर्माण होत नसतील तर पर्याय म्हणून दुसऱ्या पुरुषाची पुरुषबीजं वापरून IUI/IVF/ICSI मार्गांनी स्त्रीबीज फलित करता येतं. पाश्चात्त्य देशात स्पर्म बँक्स असतात. या बँकांत पुरुषांचं वीर्य गोठून ठेवलं जातं. एखादया जोडप्याला जरूर पडल्यावर पुरुषांचा 'बायोडेटा' वाचून, निवड करून यातील कोणाचंही वीर्य गर्भधारणेसाठी विकत घेता येतं. भारतात मात्र अजून अशा प्रकारच्या बँका अस्तित्वात आलेल्या नाहीत. भाड्याने घेतलेलंगर्भाशय (सरोगेट माता) जर स्त्रीच्या गर्भाशयात दोष असेल, ज्यामुळे तिच्या गर्भाशयात गर्भ वाढू शकणार नसेल, तर अशा वेळी काहीजण सरोगेट मातेचा पर्याय निवडतात. या तंत्रज्ञानात स्त्रीची परिपक्व बीजं स्त्रीबीजांडातून बाहेर काढली जातात. पुरुषानं हस्तमैथुन करून मिळालेल्या पुरुषबीजांवर प्रक्रिया ('स्पर्म वॉश') केली जाते. स्त्रीबीजं एका डिशमध्ये ठेवून यांच्याभोवती प्रक्रिया केलेली पुरुषबीजं सोडली जातात. फलित झालेली स्त्रीबीजं काही काळ 'इन्क्युबेटर'मध्ये उबवली जातात. नंतर ती फलित बीजं एका दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात रुजवली जातात व त्या स्त्रीला औषधं देऊन तिची मासिक पाळी बंद केली जाते. त्या स्त्रीच्या गर्भाशयाच्या आधारे गर्भ वाढतो. अशा त-हेने होणारं मूल आईवडिलांच्या गुणसूत्रांतून घडलेलं असतं. त्या मुलात ज्या स्त्रीच्या गर्भाशयात मूल वाढतं तिची कोणतीही गुणसूत्रं नसतात. हा मार्ग अवलंबण्यासाठी काही गोष्टींचा खूप बारकाईनं विचार करावा लागतो, विशेषतः कायदयाचा. 'सरोगेट' माता 'सरोगेट' मातृत्वासाठी तयार होण्याची विविध कारणं (उदा. आर्थिक व्यवहार), मूल जन्माला आलं की त्याचं पालकत्व कोणाच्या नावे असणार? मूल जर काही वेगळेपण घेऊन जन्माला आलं (उदा. काही मानसिक, शारीरिक आजार) तर त्याच्या पालकत्वाची जबाबदारी कोणाची?, 'सरोगेट' मातेला या गर्भारपणात काही इजा झाली तर तिच्या देखभालीची जबाबदारी कोणाची? अशा अनेक अटी कायदेशीरपणे कागदोपत्री २१६ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख