पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" करायचा. कोण जबाबदार आहे अशी भाषा होऊ नये अशी माझी धारणा असते." चाचण्यांचा व उपचारांचा दोघांवरही ताण पडतो. विशेषत: स्त्रीवर. या समयी दोघांनीही एकमेकांना आधार दयावा. डॉक्टरांनी विशिष्ट वेळी वीर्य तपासणीसाठी मागितलं किंवा या-या दिवशी संभोग करायला सांगितला की त्यावेळी आपली मानसिक तयारी असेलच असं नाही. कामावरून दमूनभागून आलं की दोन घास खाऊन कधी झोपतो असं झालेलं असताना, आज संभोग करणं महत्त्वाचं आहे असं डॉक्टरांनी सांगितल्यामुळे संभोग केला पाहिजे याचं वेगळं दडपण येतं. संभोगाचा 'मूड' असा बटणासारखा ऑन-ऑफ करता येत नाही. या दडपणामुळे अनेक वेळा पुरुषाच्या लिंगाला ताठरपणा येण्यास अडचण होते. त्याला संभोग जमला नाही, तर 'मी स्त्रीला साथ देऊ शकलो नाही' याचं अपराधीपण वाटतं. तर दुसरीकडे औषधं/तपासण्यांमुळे स्त्रीची मन:स्थिती बिघडलेली असते. पाळीच्या तारखा, इंजेक्शन्स, औषधं या सगळ्या गोष्टींमुळे संभोगाचा आनंद विरून जातो. (पूर्वी या सगळ्यांबरोबर स्त्रीबीज परिपक्व कधी होतं याकडे लक्ष दयायला स्त्रियांना दररोज 'बेसल टेंपरेचर चार्ट' ठेवावा लागायचा. पण ही पद्धत खात्रीलायक नाही म्हणून अनेक डॉक्टर आता याचा वापर करत नाहीत.) चिडचिड होणं, नैराश्य येणं व तणावपूर्ण वातावरण या सगळ्यांमुळे संप्रेरकांचं संतुलन बिघडतं. संभोगानंतर, 'या खेपेस तरी पाळी चुकू दे' या दडपणाने दोघांमध्ये तणाव असतो. जर पाळी आली तर खूप नैराश्य येतं. परत एक-दुसऱ्याला सावरायचं आणि पुढच्या महिन्याकडे नव्या आशेनं बघायचं. डॉ. सनत पिंपळखरे म्हणाले, "सर्वांत महत्त्वाचं असतं ते म्हणजे दोघांनी खूप रिलॅक्स' असणं, गर्भधारणेला फार महत्त्व न देणं. मी अगोदरच जोडप्याला कल्पना देतो की या अशा अडचणी येणार आहेत. मनाची तयारी ठेवा." हा प्रवास काही महिने तर काहीजणांसाठी अनेक वर्षांचा असू शकतो. काहीजण शेवटी कंटाळून किंवा आर्थिक परिस्थिती नाही म्हणून प्रयत्न सोडून देतात. डॉ. सनत पिंपळखरे म्हणाले, "मी त्यांना कायम प्रोत्साहन देत असतो. औषधांचा खूप त्रास झाला की त्यांना काही महिने ब्रेक घ्यायला सांगतो. जमत असेल तर घरच्या वातावरणापासून व या चाचण्यांपासून दूर बाहेरगावी सुट्टीवर जा असं सांगतो. या अशा ब्रेकमुळेही फायदा होतो. वातावरणात फरक पडतो. ताणतणाव कमी होतो व काही वेळा याच्यामुळे गर्भधारणा होण्यास मदत होते." दुसरं मूल काहींच्या बाबतीत पहिलं मूलं सहज होतं पण नंतर दुसरं मूल हवं असेल तर गर्भधारणा व्हायला अडचण येते. याला काही वेळा 'इन्फेक्शन्स', आजारपणं कारणीभूत असू शकतात. उदा. 'एन्डोमेट्रिऑसिस', परमा, जननेंद्रियांचा कर्करोग २१४ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख