पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कुटुंब नियोजनाची साधनं , "पुरुषाने नसबंदी केली तर पुरुषाला संभोगात थकवा येतो असं माझ्या नवऱ्याने मला सांगितलं म्हणून मग मी शस्त्रक्रिया (ट्यूबेक्टोमी) करून घेतली", एक ताई म्हणाल्या. आता या विधानात त्यांच्या नवऱ्याचा गैरसमज होता की ही चुकीची माहिती त्याने जाणूनबुजून बायकोला दिली हे सांगणं अवघड आहे. पण हे निश्चित आहे की आजही कुटुंब नियोजनाची जबाबदारी ही बहुतांश वेळा स्त्रीचीच मानली जाते. पूर्वी जेव्हा कुटुंब नियोजनाची साधनं नव्हती तेव्हा अनावश्यक गर्भधारणेची खूप भीती असायची. गर्भधारणेच्या भीतीमुळे संभोगाचा आनंद निखळपणे घेता यायचा नाही. काहीजण पाळीचक्रावर नजर ठेवून विशिष्ट दिवशीच संभोग करायचा प्रयत्न करायचे.(हा खात्रीलायक उपाय नाही हे आपण 'गर्भधारणा व प्रसूती' सत्रात पाहिलं आहे.) काहीजण एक कापडाची चिंधी घेऊन ती तेलात बुडवून संभोगाआधी योनीत घालून ठेवायचे. याच्यामुळे पुरुषबीजांना गर्भाशयाकडे सरकायला अडथळा येईल अशी धारणा होती. कुटुंब नियोजनाचा हा मार्गही खात्रीलायक नव्हता. काहीजण वीर्यपतन होण्याआधी, लिंग योनीच्या बाहेर काढून गर्भधारणा टाळायचा प्रयत्न करायचे (व अजूनही करतात). वीर्यपतन व्हायच्या अगोदर जे एक-दोन थेंब (प्रीकम) लिंगातून वीर्यपतनाच्या अगोदर बाहेर येतात त्यात ही पुरुषबीजं असू शकतात व त्यातील एका पुरुषबीजाने स्त्रीबीज फलित केलं, तर गर्भधारणा होते. म्हणून हाही उपाय खात्रीलायक नाही. जेव्हा विसाव्या शतकात र.धो. कर्वे यांनी कुटुंब नियोजनावर मोलाचं काम केलं तेव्हा त्यांच्या कार्याला समाजातून खूप विरोध झाला. कुटुंब नियोजनाची साधनं वापरून स्त्रिया व्यभिचारी बनतील, लोकसंख्या घटून राष्ट्राचा नाश होईल, अशी आरडाओरड झाली. वस्तुस्थिती अशी आहे, की आपली लोकसंख्या एक अब्जहून अधिक आहे आणि अजूनही ती नियंत्रणात आलेली नाही. जेव्हा स्त्रियांसाठी गर्भनिरोधक गोळ्या निघाल्या तेव्हा कुटुंब नियोजनात एक मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २०३