पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोठी क्रांती घडून आली. गर्भधारणेची चिंता न बाळगता लैंगिक सुख उपभोगण्याचा मार्ग मोकळा झाला. आज बाजारात असंख्य कुटुंब नियोजनाची साधनं उपलब्ध आहेत. प्रत्येक साधानाचे काही फायदे आणि तोटे आहेत. गर्भनिरोधक गोळ्या, तांबी, स्पर्मीसाईड ही सर्व फक्त कुटुंब नियोजनाची साधनं आहेत, त्यांनी एसटीआय/एचआयव्ही पासून संरक्षण मिळत नाही. निरोध हे एकच साधन आहे जे गर्भनिरोधकाचं काम करतं व त्याचबरोबर एसटीआय/एचआयव्हीपासून संरक्षण देतं.(निरोधची अधिक माहिती 'एसटीआय/एचआयव्ही/एड्स' सत्रात दिली आहे.) निरोधव्यतिरिक्त इतर काही कुटुंब नियोजनाच्या साधनांची संक्षिप्त माहिती खाली दिली आहे. कोणी कोणतं साधन वापरायचं हे त्या साधनाची पूर्ण माहिती मिळवून व डॉक्टरांचा सल्ला घेऊन ठरवावं. गर्भनिरोधक गोळ्या (उदा. माला-डी, सहेली इत्यादी.) या गोळ्या नियमित घेतल्याने स्त्रीबीज परिपक्व होत नाही. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे एक गोळी दररोज न चुकता घ्यायची असते (शक्यतो सकाळी). अधूनमधूनच जर ही गोळी घेतली व इतर कोणतंही संततीनियमनाचं साधन न वापरता योनीमैथुन झाला तर गर्भधारणा होऊ शकते. म्हणून नियमितपणा महत्त्वाचा आहे. . पूर्वी या गोळ्यांमुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता होती. आता या गोळ्यांतील रसायनांची मात्रा बदलून ही शक्यता खूप कमी झाली आहे. क्वचित केसेसमध्ये गर्भनिरोधक गोळ्या घेऊन रक्ताच्या गाठी होतात, ज्याच्यामुळे त्या स्त्रीच्या जिवाला धोका उद्भवू शकतो. गर्भार असताना या गोळ्या घेऊ नयेत. हृदयविकार किंवा रक्तदाबाचा आजार असणाऱ्यांनी किंवा धूम्रपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय या गोळ्या घेऊ नयेत. या गोळ्यांमुळे काही बायकांना मळमळायला होणं, डोकं दुखणं, स्तनं दुखणं, वजन वाढणं असे परिणाम दिसू शकतात. सुरुवातीचे काही महिने काही स्त्रियांना पाळीचा काळ सोडून इतर वेळी अधूनमधून थोडा रक्तस्त्राव होऊ शकतो. काहीजणींमध्ये यातील काही परिणाम महिन्याभरात कमी होतात. जर महिनाभरानंतरही याचे दुष्परिणाम दिसत राहिले, तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन कमी ताकदीची दुसरी गोळी घ्यावी. त्यानंतरही दुष्परिणाम दिसत राहिले तर मात्र ही गोळी वापरू नये. दुसरं कोणतं तरी कुटुंब नियोजनाचं साधन वापरावं. या गोळ्यांमुळे लैंगिक इच्छा कमी होऊ शकतात. २०४ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख