पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जुळी मुलं काहीवेळा एकापेक्षा जास्त गर्भ गर्भाशयात वाढतात. याच्यात दोन प्रकार आहेत - 'डायझायगोटिक' व 'मोनोझायगोटिक'. डायझायगोटिक जुळी स्त्रीबीजांडात सहसा महिन्याला एक स्त्रीबीज परिपक्व होतं. पण दर वेळी एकच स्त्रीबीज परिपक्व होईल असं नसतं. काही वेळा दोन स्त्रीबीजं परिपक्व होतात. जर दोन स्त्रीबीजं स्त्रीबीजवाहिन्यात आली व संभोग झाल्यावर दोन्ही बीजं दोन वेगवेगळ्या पुरुषबीजांनी फलित केली, तर दोन गर्भ एकाचवेळी गर्भाशयात वाढायला लागतात. दोन वेगवेगळ्या पुरुषबीजांनी दोन वेगवेगळ्या स्त्रीबीजांना फलित केल्यामुळे दोन्ही गर्भ दिसायला वेगवेगळे असतात. दोन्ही मुलं असतील, दोन्ही मुली असतील किंवा एक मुलगा व एक मुलगी असेल. मोनोझायगोटिक जुळी पुरुषबीजानी स्त्रीबीजाला फलित केलं की फलित बीज गर्भाशयात येऊन रुजतं. काही वेळा फलित बीज गर्भाशयात रुजायच्या अगोदर काही भागात फुटतं. कधी दोन भाग, कधी त्याहून जास्त. हा प्रत्येक भाग एक स्वतंत्र गर्भ बनून गर्भाशयात वाढू शकतो. एकच फलित बीजापासून हे गर्भ तयार झाल्यामुळे हे सर्व गर्भ दिसायला सारखे असतात. सगळे मुलगे असतात किंवा सगळ्या मुली असतात. सायमीझ जुळी काही वेळा फलित बीज गर्भाशयात रुजण्याच्या वेळी फुटू लागतं पण त्याचे पूर्ण वेगळे तुकडे होत नाहीत. यामुळे वेगवेगळे गर्भ गर्भाशयात वाढतात पण ते काही अंशी जोडलेले राहतात (उदा. छातीला, खांदयाला इत्यादी). यांना 'सायमीझ' जुळी म्हणतात. २०२ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख