पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होऊ शकते. त्याच्यावर काहीही उपाय करू नका. काही दिवसांनी आपोआप स्तनं बसतात व स्तनांतून दूध येणं बंद होतं. स्तनपान मातेच्या स्तनात दूध निर्मिती करणाऱ्या काही ग्रंथी असतात व या ग्रंथीतून दूध दूधवाहिन्यांतून बोंडात सोडलं जातं. स्तनाचा छेद दूधवाहिनी- स्तनाग्र (बोंड)- दूध निर्मिती करणाऱ्या ग्रंथी चरबी- जन्माला आल्यावर बाळाला शक्यतो मातेचं दूध पाजलं जातं. मातेचं दूध पचायला खूप सोपं असतं. त्यात बाळाला पोषक असे अनेक घटक असतात. बाळाची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास हे दूध मदत करतं. म्हणून जिथे शक्य आहे तिथे स्तनपान करावं असा सल्ला डॉक्टर देतात. सुरुवातीचं दूध पिवळसर असतं (कोलस्ट्रॅम). हे घाण दूध आहे असं समजून टाकून देऊ नये. हे दूध घाण नसतं, बाळासाठी अत्यंत पोषक असतं. बाळंतपणानंतर सरासरी दोन महिन्यांनी पाळी परत सुरू होते. काहींची पाळी एक महिन्यातही सुरू होऊ शकते, तर काहींची अनेक महिने सुरू होत नाही. काही स्त्रियांची धारणा असते, की जोवर बाळाला स्तनपान चालू आहे तोवर परत गर्भधारणा होणार नाही. स्तनपान चालू असताना पाळी न येतासुद्धा एखादं स्त्रीबीज परिपक्व होऊन स्त्रीबीजवाहिनीत येऊ शकतं. अशा वेळी गर्भनिरोधक साधनांचा वापर न करता झालेल्या योनीमैथुनातून गर्भधारणा होऊ शकते. जोडप्याला परत गर्भधारणा झाली आहे, हे लगेच लक्षात येत नाही व कालांतराने पाच-सहा महिन्यांनी लक्षात येतं. म्हणून जर बाळंतपणानंतर लगेच मूल नको असेल तर कुटुंब नियोजनाचं साधन वापरणं गरजेचं आहे. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २०१