पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंग बाहेर येणं गर्भाशय योनी अंग बाहेर येणं जर गर्भाशयाला शरीरात जखडून ठेवणारे स्नायू काही कारणांनी सैल असतील/ सैल झाले तर बाळंतपणानंतर गर्भाशय योनीत उतरू शकतं. ज्या स्त्रियांची अनेक बाळंतपणं होतात किंवा बाळंतपणाच्या वेळी मूल बाहेर यायच्या वेळेअगोदर जर खूप जोर लावला, तर हे होण्याची शक्यता असते. कधीकधी उतारवयातही गर्भाशयाला जखडून ठेवणारे स्नायू सैल झाल्यामुळे गर्भाशय योनीत उतरू शकतं. याला अंग बाहेर येणं (प्रोलॅपस् ऑफ युटेरस) म्हणतात. अशा वेळी शस्त्रक्रिया करून ते गर्भाशय आत बसवावं लागतं, नाहीतर शस्त्रक्रिया करून काढून टाकावं लागतं. बाळाचं आरोग्य बाळ जन्मल्यावर ते सुदृढ आहे की नाही याची तपासणी केली जाते ('अपगार' चाचणी). या चाचणीत जर दिसून आलं की बाळाचं वजन कमी आहे, बाळाला श्वास घ्यायला अडचण होते, बाळाला काही आजाराची लक्षणं आहेत तर गरजेप्रमाणे विशेष वैदयकीय सुविधांची गरज लागू शकते. जन्माला आल्यावर काही नवजात मुलींच्या योनीतून पहिले २-३ दिवस थोडं रक्त जाऊ शकतं. जेव्हा मुलगी आईच्या पोटात असते, तेव्हा आईच्या शरीरातील 'इंस्ट्रोजेन' संप्रेरक मुलीला मिळत असतं. बाळतपण झालं की हे संप्रेरक मिळणं अकस्मात बंद होतं. याच्यामुळे हा रक्तस्राव होऊ शकतो. २-३ दिवसांत रक्त येणं आपोआप बंद होते. काही नवजात बालकांच्या (मुलगा/मुलगी) स्तनांत थोडी वाढ झालेली दिसते. त्या स्तनांतून थोडं दूधही निघू शकतं. काहीजण या बालकांच्या स्तनांची बोंड दाबून ते दूध काढून टाकायचा प्रयत्न करतात. तसं करू नये. तसं केल्यास स्तनांना इजा २०० मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख