पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उरलेली नाळ बाहेर येते. वार पूर्णपणे बाहरे येणं महत्त्वाचं असतं. बाहेर आलेली वार डॉक्टर नीट न्याहाळून बघतात व ती संपूर्ण आहे ना याची खात्री करतात. वार जर संपूर्ण बाहेर आली नसेल तर डॉक्टरांना शस्त्रक्रियेद्वारे ती बाहेर काढावी लागते. तसं न केल्यास वारेतून खूप प्रमाणात रक्तसस्राव होऊन मातेच्या जिवाला धोका उत्पन्न होतो. एपीसीओटोमी गर्भ योनीतून बाहेर येताना योनीमुखाच्या कडा ताणून फाटू शकतात. या अशा फाटलेल्या कडांना शिवणं अवघडं जातं. त्या वेड्यावाकड्या फाटू नयेत म्हणून डॉक्टर भूल देऊन योनी व गुदद्वाराच्या मध्ये योनिमुखाला कापून योनीमुख मोठं करतात. याला 'एपीसीओटोमी' म्हणतात. बाळंतपणानंतर टाके घालून हा छेद शिवला जातो. सिझेरियन शस्त्रक्रिया जर स्त्रीला खूप त्रास होत असेल, गर्भ खूप मोठा असेल किंवा जर काही वैदयकीय कारणांमुळे योनीवाटे प्रसूती शक्य नसेल, तर अशा वेळी मूल योनीवाटे बाहेर आणण्याचा प्रयत्न न करता, स्त्रीला भूल देऊन, शस्त्रक्रिया करून, गर्भाशयाला छेद देऊन मूल बाहेर काढावं लागतं. याला 'सिझेरियन' शस्त्रक्रिया म्हणतात. मग टाके घालून गर्भाशय परत शिवलं जातं. 'सिझेरियन'ची जखम भरून यायला अंदाजे २-३ आठवडे लागतात. ? Rh (D) फॅक्टर जर गर्भाच्या रक्ताचा 'Rh(D) +' फॅक्टर असेल व मातेच्या रक्ताचा 'Rh(D)-' फॅक्टर असेल व जर गर्भाच्या रक्ताच्या एक-दोन पेशी मातेच्या रक्तप्रवाहात मिसळल्या तर या वेगळ्या प्रकारच्या रक्तपेशी बघून आईचं शरीर त्यांना मारण्यास 'अॅन्टिबॉडीज्' तयार करतं. याच्यामुळे या बाळंतपणास अडचण येत नाही पण पुढच्या गर्भधारणेत जर गर्भाच्या रक्तगटाचा 'Rh (D) +' फॅक्टर असेल, तर या 'अॅन्टीबॉडीज्' गर्भाच्या रक्तपेशींना शत्रू समजून त्यांच्यावर हल्ला करतात व त्यामुळे गर्भ पडतो. हे होऊ नये म्हणून, अशा विशिष्ट परिस्थितीत पहिल्या बाळंतपणानंतर ७२ तासांच्या आत आईला अँटि Rh(D) इंजेक्शन दिलं जातं. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १९९