पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसूतीची तारीख. उदा. शेवटच्या पाळीच्या शेवटच्या दिवसाची तारीख जर ०१/०१/२०१० असेल तर प्रसूतीची तारीख = ०१/०१/२०१० + नऊ महिने + सात दिवस = ०८/१०/२०१०. गर्भ पूर्ण वाढण्यास नऊ महिने लागतात. हळूहळू जसजसे नऊ महिने होत येतात, तसतसा गर्भारपणाच्या त्रासाचा कंटाळा येऊ शकतो. एकीकडे उत्साह असला तरी दुसरीकडे थकवा आलेला असतो. कधी एकदाचं बाळंतपण होतंय असं वाटू लागतं. ३७ आठवड्यांच्या आत प्रसूती झाली तर त्याला लवकरची प्रसूती (प्रिटर्म बर्थ) मानलं जातं. ३७ ते ४० आठवड्यांत प्रसूती झाली तर तिला वेळेवर (टर्म बर्थ) प्रसूती झाली असं मानलं जातं. जर ४० आठवड्यांच्या पुढे प्रसूती झाली तर याला 'पोस्ट डेटेड' प्रसूती समजतात. जर ठराविक काळापर्यंत प्रसूती झाली नाही तर औषधं देऊन प्रसूती घडवून आणली जाते. बाळंतपणाची वेळ जवळ आली की पहिल्यांदा गर्भाशयमुखाचं बंद तोंड उघडतं व त्याच्या तोंडावर असलेला घट्ट पदार्थ (सायकल म्युकस) निघून येतो. मग 'ऍम्निऑटिक' स्त्रावाचं कवच फुटून 'ऍम्निऑटिक' स्त्राव योनीतून बाहेर येतो. गर्भाशय आकुंचन पावायला लागतं व वेदना होऊ लागतात. हळूहळू गर्भाशयमुख व योनी ताणून मोठी व्हायला लागते. मूल योनीतून बाहेर येण्यास योनी अंदाजे ८-१० सें.मी. ताणलेली असावी लागते. गर्भाशयाच्या आकुंचनामुळे मूल योनीवाटे बाहेर येतं. सहसा पहिल्यांदा गर्भाचं डोकं योनीतून बाहरे येतं. डोकं सहज बाहेर येत नसेल तर सक्शन पंप किंवा चिमट्याचा (फोरसेप) वापर करून डोकं बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळेस डोकं पहिलं बाहेर येत नाही. ते सगळ्यात शेवटी योनीतून बाहेर येतं, याला पायाळू बाळ म्हणतात (ब्रीच बर्थ). (पायाळू बाळ अपशकुनी आहे, त्याच्यामुळे आपल्यावर संकट येतं, त्याच्याजवळ उभं राहिलं तर अंगावर वीज पडते अशा समाजात अनेक धारणा आहेत. या सर्व अंधश्रद्धा आहेत.) मूल बाहेर आलं की, मुलाच्या बाजूला नाळेवर २ क्लिपा लावून या २ क्लिपांमध्ये नाळ कापली जाते. नाळ कापल्यावर नाळेतून रक्तस्राव होऊ नये म्हणून क्लिपांचा वापर केला जातो. जर क्लिपा उपलब्ध नसतील तर स्वच्छ धाग्यानं नाळ दोन जागी घट्ट बांधून, मधून नव्या ब्लेडने नाळ कापली जाते. बाळाचा उरलेला नाळेचा भाग काही दिवसांत सुकतो व त्या जागी बेंबी उरते. काहीजण प्रसूतीच्या वेळी ग्रहण असलं व प्रसूती झाली तर अपशकुन आहे असं मानून बाळाची नाळ ग्रहण सुटेपर्यंत कापत नाहीत. या अशा अंधश्रद्धांना बळी पडून आईला व बाळाला अशा अवस्थेत ठेवून इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. बाळंतपणानंतर वीस मिनिटं ते अर्ध्या तासात मातेच्या गर्भाशयातील संपूर्ण वार, १९८ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख