पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे, याची खात्री करून घ्यावी लागते. अर्धवट गर्भपात झाला असेल तर डॉक्टरांना भूल देऊन पूर्ण गर्भपात करावा लागतो. औषधानं केलेल्या गर्भपातानंतर अंदाजे १० दिवस योनीतून थोडा थोडा रक्तस्त्राव होऊ शकतो. ११ आठवड्यांपर्यंत गर्भधारणा असेल तर 'मॅन्युअल' किंवा 'इलेक्ट्रिक' सक्शन पंपाचा वापर करून गर्भपात करता येतो. या प्रकारात गर्भपातानंतर अंदाजे १० दिवस योनीतून थोडा थोडा रक्तस्त्राव होऊ शकतो. १२ ते २० आठवड्यांचा गर्भ असेल तर औषधं देऊन प्रसूती घडवून आणली जाते (आर्टिफिशिअल स्टिम्युलेशन ऑफ लेबर). २० आठवड्यांपर्यंतच्या गर्भाची पुरेशी वाढ झालेली नसते व ते मृत जन्माला येतं. गर्भपात शास्त्रशुद्ध पद्धतीनं न केल्यास स्त्रीच्या जीवाला धोका उत्पन्न होतो. म्हणून गर्भपात अनुभवी अॅलोपॅथिक डॉक्टरांकडूनच करावा. गर्भधारणा व शारीरिक बदल गर्भ वाढू लागतो तसं स्त्रीच्या शरीरातील संप्रेरकांच्या प्रमाणात खूप बदल व्हायला लागतात. तिला मळमळायला होतं ('नॉशिया'), खूप उलट्या होतात ('हायपरएमेसिस'), चिडचिड, नैराश्य, खूप आनंद असे भावनिक चढ-उतार जाणवतात. मळमळ/उलट्या होत असल्या तरी तिच्यासाठी व गर्भाच्या वाढीसाठी तिला पुरेसा व पोषक आहार मिळणं आवश्यक असतं. त्याचबरोबर पुरेसा आराम मिळणं, प्रदूषणापासून दूर राहणं, मर्ने शांत असणं महत्त्वाचं असतं. योग्य वातावरण मिळालं नाही तर गर्भाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. उदा. पुरेसा पोषक आहार मिळाला नाही तर मूल कमी वजनाचं जन्माला येऊ शकतं. गर्भार स्त्रीचं वजन वाढू लागतं. गर्भ वाढतो तसं पोट वाढायला लागतं. पुढे वजन वाढल्यामुळे सरळ उभं राहण्यासाठी पाठीच्या स्नायूंवर जास्त ताण पडतो. याच्यामुळे पाठ दुखू शकते. गर्भ वाढताना गर्भाशयाचा दाब मूत्राशयावर पडतो म्हणून लघवीला सारखं जायला लागू शकतं. गर्भ जसा वाढू लागतो तसा पोटावर व फुफ्फुसावर दाब पडतो. अॅसिडीटी होते. धाप लागते. स्तनं जड व्हायला लागतात व त्यांच्यात दूधनिर्मिती सुरू होते. अधूनमधून गर्भाशय आकुंचन पावल्यासारख्या, न दुखणाऱ्या 'कॉन्ट्रॅक्शन्स' जाणवतात ('ब्रेक्सटन हिक्स कॉन्ट्रॅक्शन्स'). पण या बाळंतपणाच्या कॉन्ट्रॅक्शन्स' नसतात. गर्भाची वाढ पहिले २० आठवडे गर्भाचे विविध अवयव घडत असतात (डेव्हलपमेंट). वीस ते बत्तीस आठवड्यांत गर्भाच्या विविध अवयवांची घडण होत राहते व त्याच्या विविध अवयवांची वाढ होते (डेव्हलपमेंट अँड ग्रोथ). अंदाजे सहाव्या १९६ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख