पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाहिजेत, ही माहिती व नियम या अॅक्टमध्ये दिले आहेत. गर्भपात हा स्त्रीला दिलेला मूलभूत अधिकार नाही पण काही विशिष्ट कारणांसाठी गर्भपात करता येतो. यांतील कारणं पुढीलप्रमाणे-

  • जर गर्भधारणेमुळे स्त्रीच्या जिवाला धोका असेल, स्त्रीला गर्भधारणेमुळे

गंभीर शारीरिक व मानसिक आजार होण्याची शक्यता असेल,

  • ही गर्भधारणा बलात्कारातून झालेली असेल,

जर होणाऱ्या मुलाला गंभीर स्वरूपाची मानसिक/शारीरिक अॅबनॉरमॅलिटी' असण्याची शक्यता असेल,

  • कुटुंब नियोजनाचं साधन फेलं गेलं म्हणून लग्न झालेल्या स्त्रीला गर्भधारणा

झाली असेल, तर गर्भपात करता येतो.

इतर ठळक मुद्दे

  • वरील कारणांसाठी स्त्री वीस आठवडे गर्भार असेपर्यंत गर्भपात करू शकते.

जर स्त्रीच्या जिवाला गर्भधारणेने धोका नसेल तर २० आठवड्यांनंतर गर्भपात करणं गुन्हा आहे.

  • जर स्त्री प्रौढ असेल तर गर्भपात करण्यास तिची संमती असलीच पाहिजे.

बाकी कोणाच्याही (नवन्याच्याही) संमतीची जरूर नसते.

  • जर स्त्री प्रौढ नसेल तर तिच्या पालकांची संमती असली पाहिजे.
  • स्त्रीची संमती नसताना तिला जबरदस्ती करून किंवा फसवून केलेला गर्भपात

कायदयाने गुन्हा आहे.

  • फक्त रजिस्टर्ड मेडिकल प्रैक्टिशनर्स गर्भपात करू शकतात.
  • गर्भपात केंद्रात विशिष्ट सुविधा असल्याच पाहिजेत.

गर्भपाताचे प्रकार पूर्वी गर्भपात करायला ‘डायलेशन अँड रिटाज' (डी अँड सी) पद्धतीचा वापर व्हायचा. या प्रकारात डॉक्टर स्त्रीला भूल देऊन, गर्भाशयातील गर्भ व गर्भाशयाचं आतलं विशिष्ट पेशींचं अस्तर खरवडून काढायचे. आता हा प्रकार सहसा वापरला जात नाही. आता याच्यापेक्षा सुधारित पर्याय उपलब्ध आहेत. ४९ दिवसांपर्यंत गर्भधारणा झाली असेल तर औषधं घेऊन गर्भपात करता येतो. हे 'ओपीडी'त होऊ शकतं. पहिल्या दिवशी औषध देऊन गर्भाशयाचं अस्तर गर्भाशयापासून सुटं केलं जातं. ४८ तासांनंतर त्या स्त्रीनं परत येऊन दुसरं औषध घ्यायचं, ज्याने ३-४ दिवसांत गर्भाशय आकुंचन पावतं व गर्भाशयाचं तोंड उघडून गर्भपात होतो. दोन आठवड्यानंतर डॉक्टरांकडून तपासणी करून पूर्ण गर्भपात झाला मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १९५