पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९८० ९७० ९७६ ९६४ ९६२ ९६० ९५० ९४० ९३० ९२० ९१० ९०० ९२७ W BADAN २००१ 000 भारतीय जनगणना अहवालानुसार ० ते ६ वयोगवतील मुलींचे प्रमाण पर हजार मुलांमागे ओळखता येत नाही. या प्रथेला आळा बसावा म्हणून पीसीपीएनडीटी अॅक्ट अमलात आला. या अॅक्टचे महत्त्वाचे मुद्दे - १. गर्भाच्या लिंगाचं निदान करण्यासाठी कोणतीही चाचणी करणं कायदयाने गुन्हा आहे. २. विशिष्ट लिंगाचा गर्भ तयार होईल यासाठी कोणत्याही प्रक्रियेचा वापर करणं कायदयानं गुन्हा आहे. (उदा.x,Y सेपरेशन) ३. अल्ट्रा सोनोग्राफीसारख्या उपकरणांचा उपयोग गर्भाची वाढ व्यवस्थित होत आहे हे बघण्यासाठी केला जातो व ही तपासणी करताना गर्भाचं लिंग डॉक्टरांना कळतं. डॉक्टरांना गर्भाचं लिंग कळलं तरी त्यांनी ते पालकांना सांगायचं नसतं. तसं सांगणं कायदयाने गुन्हा आहे. ४. गर्भाच्या लिंगाचं निदान करायची कोणतीही जाहिरात करणं कायदयाने गुन्हा आहे. गर्भपात काहीजणांना गर्भधारणा होते व ती नको असते. काहींचा विवाह झालेला नसतो तर काहींची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. काहींनी शास्त्रशुद्ध पद्धतीनं कुटुंब नियोजनाची साधनं वापरलेली नसतात, तर काहींची कुटुंब नियोजनाची साधनं 'फेल' होतात. काहींवर बलात्कार होऊन गर्भधारणा झालेली असते. गर्भपात कायदा : ('द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अॅक्ट, १९७१'- एमटीपी अॅक्ट) किती काळ स्त्री गर्भार असेपर्यंत गर्भपात करता येतो, गर्भपातासाठी कोणाची संमती असली पाहिजे, गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांकडे काय सुविधा असल्या १९४ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख