पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुलाच्या पेशीची गुणसूत्र AK K18 ४४ 00. X3 88 88 XXXX 88 XXX 8 X 88 XX indi XX 88 88 XX Xh KA A X Y याच्यावरून स्पष्ट आहे की मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे स्त्रीच्या हातात अजिबात नाही. दुसरी गोष्ट, कोणतं पुरुषबीज स्त्रीबीजाला फलित करेल हे पुरुषालाही ठरवता येत नाही. म्हणूनच गर्भ मुलीचा होणार की मुलाचा होणार हे दोघांच्याही हाती नसतं. 'संभोग झाल्यावर स्त्रीनं उजव्या कुशीवर झोपल्यावर मुलगा होतो' किंवा 'पुत्रकामेष्टीयज्ञ केल्यावर मुलगा होतो' या सर्व अधंश्रद्धा आहेत. यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. जर आपण पुरुष व स्त्री यांच्याकडे समानतेच्या दृष्टीने पाहिलं तर आपल्याला मुलगा होतो की मुलगी होते याला काही महत्त्व उरत नाही. गर्भलिंग परीक्षा कायदा (द प्री-कन्सेप्शन अँड प्री-नेटल डायग्नोस्टिक टेक्निक्स अॅक्ट, १९९४- 'पीसीपीएनडीटी' अॅक्ट) विविध सर्वेक्षणं दाखवून देत आहेत, की जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे व मुलींची संख्या कमी दिसू लागली आहे. २००० सालचा गणसंख्येचा अहवाल दाखवतो, की २००० साली १००० मुलांमागे ९२७ मुली आहेत. पुढचे गणसंख्येचे अहवाल काय चित्र दाखवणार? स्त्री गर्भार झाली की मुलगाच हवा या अट्टहासातून गर्भ-लिंग परीक्षा केली जाते. मुलगी असेल तर स्त्रीला गर्भपात करण्यास भाग पाडलं जातं. साहजिकच डॉक्टरांच्या मदतीशिवाय गर्भाचं लिंग मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १९३