पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चाचण्या गर्भधारणा झाली की अंदाजे दोन आठवड्यांनी स्त्रीच्या लघवीतून 'ह्यूमन खोरायॉनिक गोनॅडोट्रॉफिन' (HCG) हा स्त्राव जायला लागतो. म्हणून लघवीची तपासणी करून गर्भधारणेचं निदान करता येतं. हल्ली 'प्रेग्नंसी टेस्ट किट' उपकरणाचा वापर करून घरच्याघरीसुद्धा ही चाचणी करता येते. हे उपकरण मेडिकलच्या दुकानात मिळतं. गर्भधारणा झाली असेल तर खात्रीसाठी डॉक्टरांकडून परत लघवीची चाचणी करून घ्यावी. गर्भधारणा झाली, की या चाचणीव्यतिरिक्त अजूनही काही चाचण्या केल्या जातात. स्त्रीची शारीरिक तपासणी, सोनोग्राफी, हिमोग्लोबिनचं प्रमाण, रक्तातील साखरेचं प्रमाण, 'गर्मी' एसटीआयची चाचणी, एचआयव्हीची चाचणी केली जाते. या तपासण्यांच्या निदानावरून मातेला आवश्यक ती औषधं देता येतात. रक्तात पुरेसं लोहाचं प्रमाण असावं म्हणून शंभर दिवस लोहाच्या गोळ्या दिल्या जातात. मुलगा का मुलगी? मानवी शरीराच्या प्रत्येक पेशीत काही गुणसूत्र असतात. प्रत्येक मानवी पेशीत (पुरुषबीज व स्त्रीबीजाचा अपवाद वगळता) ४६ गुणसूत्र असतात (२३ जोड्या). पुरुषबीजं व स्त्रीबीजं मात्र अपवाद आहेत. स्त्रीबीज व पुरुषबीज निर्मिती होते तेव्हा प्रत्येक पुरुषबीजात व प्रत्येक स्त्रीबीजात फक्त अर्धी गुणसूत्र असतात (२३ गुणसूत्र). प्रत्येक स्त्रीबीजातलं २३वं गुणसूत्र कायम 'x' असतं. प्रत्येक पुरुषबीजामधील २३वं गुणसूत्र 'x' किंवा 'Y' असू शकतं. याचा अर्थ वीर्यपतन झाल्यावर वीर्यातल्या कोट्यवधी पुरुषबीजांमधील अंदाजे अर्ध्या पुरुषबीजांत २३वं गुणसूत्र 'x' असतं व बाकीच्या अर्ध्या पुरुषबीजांत २३वं गुणसूत्र 'Y' असतं. जेव्हा पुरुषबीज व स्त्रीबीज यांचं मीलन होतं तेव्हा फलित झालेल्या बीजात स्त्रीची व पुरुषाची गुणसूत्र एकत्र येतात. म्हणजे फलित झालेल्या बीजात परत ४६ गुणसूत्रं (२३ जोड्या) तयार होतात. या गुणसूत्राच्या जोड्या होणाऱ्या गर्भाचा नकाशा बनतात. (बाळाने कुरळे केस बाबाकडून घेतलेत व गोरा रंग आईकडून घेतला याचा अर्थ आता लक्षात येतो). या गुणसूत्रातील २३ वी जोडी मुलगा होणार की मुलगी होणार हे ठरवते. म्हणून या २३ व्या जोडीला लिंग गुणसूत्र म्हणतात (सेक्स क्रोमोझोम्स). जर २३ वं गुणसूत्र 'Y' असणाऱ्या पुरुषबीजानी स्त्रीबीज फलित केलं तर मुलगा होतो; जर २३ वं गुणसूत्र 'x' असणाऱ्या पुरुषबीजानी स्त्रीबीज फलित केलं तर मुलगी होते. स्त्रीबीज पुरुषबीज गर्भ xx मुलगी XY मुलगा + x X X Y + %3D १९२ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख